शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
5
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
6
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
7
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
8
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
9
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
10
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
11
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
12
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
13
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
14
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
15
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
16
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
17
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
18
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
19
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
20
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?

२००० सार्वजनिक ग्रंथालये बंद अवस्थेत, वर्गबदल सरकारच्या ध्यानीमनीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 19:51 IST

ग्रंथपाल दिन विशेष : भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांचा १२ आॅगस्ट हा जन्म दिन. हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

ठळक मुद्दे२०१२ पासून ग्रंथालयांना शासनाच्या परवानगीची प्रतीक्षामहाराष्ट्रात अ वर्गाची ३३४, ब वर्गाची २ हजार १२०, क वर्गाची ४ हजार १५३ आणि ड वर्गाची ५ हजार ५४१  ग्रंथालये आहेत.

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : महाराष्ट्रातील १२ हजार १४४ सार्वजनिक ग्रंथालयांपैकी सुमारे २ हजारांहून अधिक ग्रंथालये आज बंद अवस्थेत आहेत. त्यांची मान्यता चालू आहे; परंतु ग्रंथालये चालवणे आता परवडण्यासारखे राहिलेले नाही म्हणून ग्रंथालय चालक शासकीय अनुदान घ्यायलाही तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे. २०१२ पासून ग्रंथालयांना परवानगी आणि वर्गबदल हे सरकारच्या ध्यानीमनीही नाही. कोरोनामुळे सध्या सगळी ग्रंथालये बंदच आहेत.भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक एस. आर. रंगनाथन यांचा १२ आॅगस्ट हा जन्म दिन. हा दिवस ग्रंथपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

सेवानियम नाहीत...महाराष्ट्रात अ वर्गाची ३३४, ब वर्गाची २ हजार १२०, क वर्गाची ४ हजार १५३ आणि ड वर्गाची ५ हजार ५४१  ग्रंथालये आहेत. अ-४, ब-३, क-२ आणि ड-१ या पॅटर्ननुसार कर्मचारी संख्या असते. अ आणि ब वर्गातील ग्रंथालये किमान सहा तास व क आणि ड वर्गातील ग्रंथालये किमान तीन तास चालू ठेवणे आवश्यक आहे. या ग्रंथालयांमध्ये काम करणाऱ्या  राज्यातील एकूण २१ हजार ६१३ कर्मचाऱ्यांना ग्रंथालयाच्या वर्गवारीनुसार पगार असून, पाच हजारांहून अधिक पगार कुणालाच नाही. ग्रॅच्युईटी- प्रॉव्हिडंट फंडाची सुविधा नाही. पेन्शन तर फारच लांब राहिले. कुठलेही सेवानियम नसल्यामुळे अलीकडेच पाच कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली.  ग्रंथालयांना मिळणारे अनुदान भरीव स्वरूपाचे नाही. अ वर्गातील ग्रंथालयास २ लाख ८८ हजार, ब वर्गातील ग्रंथालयास १ लाख ९२ हजार, क वर्गातील ग्रंथालयास ९६ हजार आणि ड वर्गातील ग्रंथालयास फक्त ३० हजार एवढेच काय ते अनुदान मिळते.

रक्कम व्यपगत होते... वर्गबदल आणि नवीन मान्यता बंद असल्याने २०१२ पासून ग्रंथालये शेवटच्या घटिका मोजत आहेत. शिवाय त्या त्या जिल्ह्यात डीपीडीसीत ग्रंथालयांसाठी राखून ठेवण्यात आलेल्या रकमाही वितरित केल्या गेल्या नसल्याने व्यपगत होत आहेत. शासकीय ग्रंथालय अधिकाऱ्यांना डीपीडीसीच्या बैठकींना जाऊन हात हलवीत यावे लागते.

पोषक वातावरणाचे काय....‘वाचाल तर वाचाल’ असे म्हटले जाते. समाजाचा आरसा म्हणून ग्रंथालये कित्येक पिढ्यांपासून ठामपणे उभी आहेत. ग्रंथालयाच्या प्रगतीवरूनच त्या  देशाची प्रगती ठरवली जाते. एरव्ही सारेच जण वाचनसंस्कृती वाढली पाहिजे, याची चिंता करताना दिसतात; पण त्यासाठीच्या पोषक वातावरणाचे काय, हा खरा प्रश्न आहे. आहे ती ग्रंथालये शेवटची घटिका मोजत आहेत. आपण मात्र ग्रंथपाल दिनानिमित्त आत्मनिर्भरतेच्या ढेरपोट्या शुभेच्छा देऊन मोकळे होणार.. नवीन शैक्षणिक आराखड्यातील अभ्यासक्रमात तरी ग्रंथालयशास्त्राला प्राधान्य दिले जाईल की नाही, याबद्दल साशंकता आहे. 

तीव्र चिंता...मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गुलाबराव मगर, प्रमुख कार्यवाह भास्कर पिंपळकर, विवेकानंद महाविद्यालयाचे विषय शिक्षक अनिल लहाने, राजगुरू सार्वजनिक वाचनालय, नारेगावचे ग्रंथपाल जगन्नाथ सुभाष सोळंके आदींनी ग्रंथालयांसमोरील वाढत्या अडचणींबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे, तर शासकीय विभागीय ग्रंथालयातील ग्रंथपाल सुभाष मुंढे यांनी ग्रंथपाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :Educationशिक्षणState Governmentराज्य सरकारfundsनिधी