शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

मराठवाड्यात आचारसंहितेपूर्वी बांधकाम विभागाच्या २ हजार कोटींच्या कामांचा बार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 18:55 IST

मराठवाड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३०० कामांचे भूमिपूजन व सुमारे ५० कामांचे लोकार्पण २० सप्टेंबरपूर्वी करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मराठवाड्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३०० कामांचे भूमिपूजन व सुमारे ५० कामांचे लोकार्पण २० सप्टेंबरपूर्वी करण्यात येणार आहे. अंदाजे २ हजार कोटींच्या कामांचा बार आचारसंहितेपूर्वी उडणार आहे. दोन्ही विभागातील ५ हजार ७५५ कामांसाठी ३४ हजार ३७३ कोटींची कामे मंजूर आहेत.

गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या छत्रपती संभाजीनगर व नांदेड या विभागांच्या एकत्रित आढावा बैठकीनंतर बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, सव्वा दोन वर्षांत बांधकाम विभागाने ०३, ०४ हेड अंतर्गत मोठे पूल, रस्ते, इमारती बांधकामांत ९२ हजार कोटींचा निधी दिला. निवडणूक आचारसंहितेत कामे थांबू नयेत यासाठी अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, वर्कऑर्डर व प्रत्यक्ष कामाला सुरुवात, भूमिपूजन, लोकार्पण करणे गरजेचे आहे. २० सप्टेंबरपूर्वी सर्व कामे मंजूर होऊन त्यांची वर्कऑर्डर देण्यासाठी तसेच रिक्त पदभरती, अनुकंपातून भरावयाच्या रिक्त जागा तातडीने भरण्याचे आदेश दिले. कंत्राटदारांची ५ हजार कोटींची थकबाकी आहे. ४ हजार कोटींचा निधी मध्यंतरी दिला. येणाऱ्या काळात बिले तातडीने देण्यासाठी अर्थ खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे. सारथीचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासह शहरातील प्रशासकीय संकुलाचे कामही लवकरच सुरू होईल. असे चव्हाण यांनी नमूद केले.

७ हजार ४५८ किमी रस्ते खड्ड्यांतदोन्ही प्रादेशिक विभागातील २२ हजार २५६ किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्यांपैकी ७ हजार ४५८ किलोमीटर लांबीचे खड्डे भरण्यासाठी २३३ कोटींची वार्षिक तरतूद शासनाने केली आहे. येथील विभागात ८० टक्के, नांदेडमध्ये ९२ टक्के काम पूर्ण झाले. दर आठवड्यात मुख्य अभियंत्यांनी २ दिवस, अधीक्षक अभियंत्यांनी २, कार्यकारी अभियंत्यांनी ३ दिवस खड्डे दुरुस्ती तपासून अहवाल द्यावा. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे दुरुस्तीचे आदेश दिल्याचे चव्हाण म्हणाले.

आस्थापना मर्ज होणार नाहीबांधकाम विभागापेक्षा महामंडळ बळकट होत आहेत, यावर चव्हाण म्हणाले, निधी उपलब्ध करण्यासाठी वित्तीय संस्थांची मदत लागते. महामंडळाकडून निधी उपलब्ध होणे सोपे होते. विभागाची आस्थापना महामंडळाकडे जाणार नाही. तांत्रिक व्यवस्था उभी करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय मेडिकल कॉलेजसाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू असून इमारतींची कामे वेळेत करण्याकडे लक्ष आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्ग