शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीला अंधारात ठेवून २०० वर्षांपूर्वींच्या झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 17:13 IST

ग्रामपंचायत सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थाने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतीने केले तोडलेले लाकडे जप्तग्रामपंचायत सदस्यानेच आदेश दिल्याचे उघड

खुलताबाद ( औरंगाबाद ) : सोनखेडा ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता ग्रामपंचायत सदस्याने गावातील दोनशे वर्षापूर्वींची चिंच आणि लिंबाची दोन महाकाय वृक्ष परस्पर आदेश देऊन तोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आली आहे. झाडे तोडण्याचे आदेश देणाऱ्या ग्राम पंचायत सदस्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थाने तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.

तालुक्यातील सोनखेडा ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेले चिंचेचे झाड व  सामाजिक सभागृहाच्या बाजूचे लिंबाचे झाड ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र नामदेव कसारे यांनी लाकूड व्यापारी पुंडलिक महादू वाकळे यांना दिले. व्यापाऱ्याने २५ ऑगस्ट आणि २८ ऑगस्टला दोन्ही महाकाय वृक्ष जमीनदोस्त केली आहे. मात्र, याबाबत कसारे यांनी ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आले. ग्रामपंचायतीच्या हद्दीतील व मालकीची ही झाडे तोडण्यासाठी ग्रामपंचायत अथवा वनविभागाची कुठलीही परवानगी अथवा लिलाव न करता शासकीय मालमत्तेची विल्हेवाट लावणे गंभीर असून याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कसारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची लेखी तक्रार ग्रामस्थ संतोष अंबादास लाटे यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतची प्रतिलिपी वनवि़भाग व पोलीस निरीक्षक खुलताबाद यांना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणाची मला माहिती नाही याबाबत बघून चौकशी करतो असे गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर यांनी सांगितले.

ग्रामसभेत झाडांच्या कत्तली विषयी चर्चासोनखेडा ग्रामपंचायतीची  मंगळवारी ( दि. ३१ ) सरपंच ललिता सोनवणे व जि. प. सदस्य सुरेश सोनवणे यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. यावेळी अवैधरित्या तोडण्यात आलेल्या झाडांबाबत चर्चा झाली. यापुढे कोणीही पूर्व परवानगी शिवाय झाडे तोडू नये असा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला. तसेच दोन्ही झाडे तोडण्यास जबाबदार असणाऱ्या तिघांना प्रत्येकी तीन हजार रूपये दंड आकारण्यात आल्याची माहिती आहे. 

पंचनाम्यात सदस्याने तोडण्याचा आदेश दिल्याचे नमूद लिंबाच्या झाडाची लाकडे ग्रामपंचायतीने जप्त केली आहेत. ग्रामसेवक जनार्दन आधाने यांनी २९ ऑगस्ट रोजी तोडलेल्या झाडांचा स्पॉट पंचनामा केला. पंचनाम्यात ग्रा. पं. सदस्य राजेंद्र कसारे यांच्या सांगण्यावरून झाडे तोडल्याचा जबाब लाकडाचे व्यापारी पुंडलीक महादू वाकळे यांनी दिल्याचे नमूद केले आहे. तसेच ग्रामपंचायतीत याबाबत काहीही कल्पना नाही व कुठलीही झाडे तोडण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे ही नमूद आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणAurangabadऔरंगाबाद