शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला २० वर्षे सक्तमजुरी

By प्रभुदास पाटोळे | Updated: November 24, 2023 14:24 IST

पोक्सोसह भादंविनुसार शिक्षा; एकूण २१ हजार रुपये दंड

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी लखन भिकन नरवडे (२२) याला विशेष सत्र न्यायाधीश ए.एस. वैरागडे यांनी गुरुवारी (दि. २३) २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली २१ हजार रुपये दंड ठोठावला.

याबाबत अल्पवयीन (१३ वर्षे ८ महिने) पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील हे जोडपे कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. पीडिता ही आजीच्या गावी शिक्षण घेत होती. घटनेच्या दोन महिन्यांपूर्वीच ती आई-वडिलांकडे आली होती. ते तिसऱ्या मजल्यावर आणि आरोपी त्याच इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याने राहतात.२० जून २०२२ रोजी पीडितेचे आई-वडील कामावर गेले होते. पीडिता व तिचा लहान भाऊ (१०) घरी होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास पीडितेचा भाऊ खेळण्यासाठी बाहेर गेला होता. ही संधी साधत आरोपी लखन तिच्या घरी गेला व तुझा भाऊ तुला खाली बोलावतो असे सांगितले. मात्र पीडिता घराबाहेर आली नाही. त्यामुळे आरोपीने तिच्या घरात घुसून पीडितेचा हात धरून तिला तळमजल्यावरील बाथरूममध्ये नेऊन बळजबरी अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास तिला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी तेथून निघून गेला होता. घटनेच्या दुसऱ्या दिवशी २१ जून २०२२ रोजी सकाळी पीडितेने घडलेला प्रकार आईला आणि त्यानंतर दोघींनी आरोपीच्या आईला सांगितला. त्यानंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

तपासाअंती उपनिरीक्षक शिवाजी घोरपडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणी वेळी सहायक लोकअभियोक्ता बी.आर. लोया यांनी ८ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. त्यात पीडिता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी आणि तपास अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी लखन नरवडे याला दोषी ठरवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली पोक्सोच्या कलम ४(२) अन्वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंड ठोठावला. तसेच पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ५०६ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादCourtन्यायालय