शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात आयटीआयच्या २० हजार जागा; सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेला होणार सुरूवात

By राम शिनगारे | Updated: May 31, 2024 13:34 IST

मिशन ॲडमिशन: दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आयटीआय, पॉलिटेक्निक आणि अकरावीच्या तीन शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : दहावीनंतर झटपट प्रशिक्षण घेत नोकरी मिळविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये खासगी आणि शासकीय आयटीआयमध्ये २० हजार ८२८ जागा उपलब्ध असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आयटीआय, पॉलिटेक्निक आणि अकरावीच्या तीन शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. आई-वडिलांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक विद्यार्थी दहावीनंतर आयटीआयचा मार्ग निवडतात. आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तत्काळ नोकरी मिळते. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठीही तांत्रिक प्रशिक्षण मिळालेले असते. त्यामुळे विद्यार्थी लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहतो. त्यासाठी अनेक विद्यार्थी आयटीआयला प्राधान्य देतात. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला येत्या सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

कोणत्या जिल्ह्यात किती जागामराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शासकीय आयटीआय ११ महाविद्यालयांत २ हजार ३२ जागा उपलब्ध आहेत तर खासगीच्या ८ मध्ये ५१६ जागा आहेत. बीड जिल्ह्यात १२ सरकारीमध्ये १९४४ तर १७ खासगीमध्ये १५००, हिंगोलीत ६ सरकारीत ६०४ तर ३ खासगीत ३३२, जालनात ७ शासकीयमध्ये १३१६, तर ४ खासगीत १००, लातूरमध्ये ११ शासकीयमध्ये २५३२, तर ११ खासगीत ९३६, नांदेडमध्ये १७ सरकारीत २६८८, तर ८ खासगीत १८२४, धाराशिवमध्ये ८ सरकारीत १५०८ तर १० खासगीत ५८४ आणि परभणीत ९ शासकीय आयटीआयमध्ये १४६८ तर ६ खासगीमध्ये ९४४ जागा उपलब्ध आहेत.

मराठवाड्यातील आयटीआयची आकडेवारीसंस्था....................... कॉलेजची संख्या...........उपलब्ध जागासरकारी.....................८२...........................१४०९२खाजगी................६७..................................६७३६एकूण.................१४९.................................२०,८२८

आयटीआय प्रवेशाची टक्केवारी वाढणारमागील वर्षी कमी मागणीचे अभ्यासक्रम बंद करून जास्त मागणी असलेले अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्य शासनाच्या विविध योजनांतून अद्ययावत यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची टक्केवारी वाढणार आहे.-अभिजित आलटे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणiti collegeआयटीआय कॉलेज