शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २० टक्केच पीक कर्ज वाटप!

By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST

जलना : संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे.

जलना : संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पीक कर्ज वाटपाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे. शुक्रवारपर्यंत केवळ २० टक्केच कर्ज वाटप झाले असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांसमोर बी, बियाणे खते खरेदी आणि पेरणीसाठी पैसा नसल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. वारंवार बँकेत खेटे मारूनही कर्ज वितरित होत नसल्याने हतबल शेतकऱ्यांनी सावकारांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. या जिल्ह्यास गेल्या खरीप हंगामात ६२४. ५१ लाख एवढे पीक कर्जाचे उद्दिष्ट होते; परंतु महसूल प्रशासनाने बँकांच्या मागे मोठा तगादा लावल्यानेच ७१३ कोटी रुपयांचे पीकइकर्ज वितरित झाले. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वितरीत झाले. गतवर्षी समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक होती. फेब्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. गेल्या दोन वर्षांपूर्वीचा दुष्काळ पाठोपाठ गारपिटीच्या संकटाने ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली. या संकटातून सावरत शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे. गेल्या महिनाभरापासून खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी जमीन सज्ज केली असून, मोठा पाऊस पडल्यास पेरणी सुरु होणार असे चित्र आहे. परंतु, बँकांकडून आजपर्यंत एक नया पैसाही शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही, असे चित्र आहे. शेतकरी विविध बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु बँका कासवगतीने कर्ज वाटप करत आहेत. मात्र, यासाठी शेतकऱ्यांची पदोपदी अडवणूक करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांना बँकेत दररोज चकरा माराव्या लागत आहेत. आज या, उद्या या, तुमच्या कागदपत्रांत काही त्रुटी आहेत, अशा अनेक गोष्टी ऐकाव्या लागत आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यावर्षी खरीप हंगामाचे ७९७ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे; परंतु ७ जूनपर्यंत १५३ कोटी ७३ लाख एवढे म्हणजे सरासरी २० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २२ कोटी ९९ लाख पीक कर्ज वाटप केले, ग्रामीण बँकेने ४४ कोटी २१ लाख, सहकारी बँकने ८६ कोटी ५१ लाख, खाजगी बँकेने ६ कोटी २ लाख पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्हा आग्रणी बँकचे व्यवस्थापक महेश बोरूडे म्हणाले, लवकरच दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. खरीप आणि रब्बीचा असा १ वर्षाचा ९६६ कोटी २५ लाख पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. येत्या १ आक्टोबरपासून रब्बीचे देखील पीक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शेतकरी सावकारांच्या दारात...खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज प्रक्रियेची कागदपत्रे तयार केली. मात्र बँकांच्या अडचणुकीच्या धोरणामुळे, उडवाउडवीच्या उत्तरांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कर्ज न मिळाल्यास नाईलाजास्तव सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे अनेक शेतकरी सांगतात.