शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पैसे खाली पडल्याचे सांगत २ लाख ८० हजारांची रक्कम पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 19:11 IST

रस्त्यावर दीडशे रुपये पडल्याची बतावणी करून केले लक्ष विचलित

ठळक मुद्देदुसऱ्याने लागलीच गाडीची बॅग पळवली

हिंगोली : पैसे पडल्याचे सांगत दुचाकीला अडकविलेली २ लाख ८० हजार रुपयांची रक्कम ठेवलेली बॅग चोरट्यांनी पळविली. ही घटना हिंगोली शहरातील खुराणा पेट्रोल पंपाजवळ २ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.हिंगोली शहरातील मोंढ्यातील व्यापारी विक्रम अग्रवाल यांच्याकडे राजू बेंगाळ हे कामाला आहेत. गुरूवारी दुपारी बेंगाळ बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी बँकेतून २ लाख ८० हजार रुपये काढून बॅगमध्ये ठेवले. पैशाची बॅग दुचाकीला अडकवून ते मोंढ्याकडे निघाले होते. त्यांची दुचाकी खुराणा पेट्रोल पंपाजवळ आली असता तेथे थांबलेल्या एकाने तुमचे दीडशे रुपये पडले असे सांगितले. त्यामुळे बेंगाळ यांनी दुचाकी थांबवून दीडशे रुपये घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, या संधीचा फायदा घेत दुसऱ्याने दुचाकीला अडकविलेली पैशाची बॅग पळविली. या वेळी बेंगाळ यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकीवरून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थागुशाचे उदय खंडेराय, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडीत कच्छवे, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, नितीन केणेकर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

हेही वाचा - खासदार नांदेडमध्येच बोलतात दिल्लीत बोलता येत नाही; आमदार अमर राजूरकरांची बोचरी टीका

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीHingoliहिंगोली