शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाला २ कोटी खर्च तरीही विद्यापीठात सुरक्षेचे तीनतेरा; ना प्रशासन गंभीर ना सुरक्षारक्षक

By राम शिनगारे | Updated: February 13, 2024 13:31 IST

विद्यापीठात सुरक्षेसाठी प्रतिमहिना १५ ते २० लाख रुपये खर्च विद्यापीठ करते आहे. तरीही सुरक्षा रामभरोसे आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी विद्यापीठ प्रशासन प्रतिवर्षी २ कोटी रुपये खर्च करते. प्रत्येक दिवशी तीन शिफ्टमध्ये ७५ सुरक्षारक्षक तैनात असले तरी मागील काही महिन्यांपासून विद्यापीठाच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे. परिसरात विद्यार्थिनींची छेड काढली जात असताना, तेथील सुरक्षारक्षकाने प्रशासनाला साधी माहितीही दिली नसल्याचे समोर आले.

विद्यापीठात सुरक्षेसाठी प्रतिमहिना १५ ते २० लाख रुपये खर्च विद्यापीठ करते आहे. तरीही सुरक्षा रामभरोसे आहे. काही महिन्यांपूर्वी एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने विद्यापीठातील विविध इमारती, बोर्डांवर संघटनेची नावे लिहून विद्रुपीकरण केले होते. तेव्हाही सुरक्षारक्षकांनी कोणाला अडवले नाही. तत्पूर्वी, एका विद्यार्थ्याने प्रेमप्रकरणातून परिसरात जाळून घेण्याचा प्रयत्न केला. त्या घटनेत काहीही कारवाई न झाल्यामुळे त्याच विद्यार्थ्याने शासकीय विज्ञान संस्थेत विद्यार्थिनीला पेटवून स्वत:ही जाळून घेतले. त्याशिवाय विद्यापीठातून अनेक वेळा चोरीचा प्रयत्न झाला आहे. सुरक्षा व्यवस्था चोख करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून समोर आले आहे.

घटनेनंतरही आढावा नाहीचविद्यापीठ परिसरात गुरुवारी रात्री ८ वाजता विद्यार्थिनीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानंतर कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी अद्यापही आढावा घेतला नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

पीडित विद्यार्थिनी ग्रामीण भागातीलवाय पॉइंट परिसरात छेड व अपहरणाचा प्रयत्न झालेल्या विद्यार्थिनी परभणी, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील असून, त्या दहावीनंतर शिक्षणासाठी नायलेट संस्थेत आल्या आहेत. घटनेची माहिती घरी समजल्यास शिक्षणापासून वंचित राहावे लागेल, अशी भीतीही विद्यार्थिनींनी बोलून दाखवली.

पोलिसांच्या अहवालाची अंमलबजावणी नाहीचसंशोधक विद्यार्थ्यांच्या जळीत कांडानंतर शहर पोलिसांनी विद्यापीठातील सुरक्षायंत्रणेवरच्या त्रुटींवर बोट ठेवले होते. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. सुरक्षारक्षक तत्काळ माहिती देत नाहीत. प्रशासन सुरक्षेवर गंभीर नसल्याचेही ताशेरे पोलिसांनी ओढले होते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद