शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

१९६५ संशोधकांना प्रतिमहिना मिळते सात कोटी रुपये शिष्यवृत्ती; देशातील एकमेव विद्यापीठ

By राम शिनगारे | Updated: June 19, 2023 12:23 IST

विद्यापीठातील १९६५ संशोधक विद्यार्थ्यांना सरासरी ३५ हजार रुपये प्रतिमहिना

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन करणाऱ्या १९६५ विद्यार्थ्यांना प्रतिमहिना सात कोटी रुपयांपेक्षा अधिक शिष्यवृत्ती मिळत आहे. हा आकडा प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारांपेक्षा अधिक आहे. राज्य शासनाच्या संस्थांकडून १३०२, तर केंद्र शासनाच्या संस्थांकडून ६६३ विद्यार्थ्यांना सरासरी ३५ हजार रुपये प्रतिमहिना शिष्यवृत्ती देण्यात येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळविणारे हे देशातील एकमेव विद्यापीठ असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

मराठवाड्यातील युवकांमध्ये जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याच्या तयारीमुळे विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहेत. आता मराठवाड्यातील युवकांनी संशोधनातही आघाडी घेतल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तब्बल १९६५ संशोधकांना राज्य, राष्ट्रीय स्तरावरील संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळते. प्रतिमहिना शिष्यवृत्तीचा आकडा सात कोटी रुपयांपेक्षा अधिक असून, वार्षिक ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळते. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, विद्यापीठात शिक्षणासाठी येणारे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील तरुण प्रचंड मेहनती आहेत. हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षांमध्ये यश मिळवून शिष्यवृत्ती मिळवितात. केमिस्ट्री विभागातील विद्यार्थ्यांनी तर ऐतिहासिक कामगिरी नोंदविल्याचे त्यांनी सांगितले.

प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे वेतन पावणेसहा कोटीविद्यापीठात १४५ कार्यरत प्राध्यापकांना वेतनापोटी प्रतिमहिना अंदाजे पावणेतीन कोटी रुपये तर ४२१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरासरी तीन कोटी रुपये पगार मिळतो. दोघांचा पगार पावणेसहा कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र, त्यांच्यापेक्षा अधिकची रक्कम संशोधक विद्यार्थ्यांना मिळत असल्याची आकडेवारी समोर आली आहे.

विद्यार्थ्यांचा अभिमान....संशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळविणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे. ते खूप मेहनती आणि सक्षम आहेत. विद्यापीठात त्यांना पोषक वातावरण असून, ग्रंथालयात दररोज ५०० ते ६०० विद्यार्थी अभ्यास करतात. ज्ञान मिळविण्यासाठी परिश्रम घेतात. त्या मेहनतीचे शिष्यवृत्ती हे फळ आहे. त्याचा विद्यापीठाला अभिमान आहे.-डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

या संस्था देतात संशोधन शिष्यवृत्तीसंस्थेचे नाव.........................................................................विद्यार्थी संख्याडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी).........६८१राजर्षी शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी)...........४४८महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्याेती).... १७३राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती.................................................२९३अनुसूचित जमातीसाठीची राष्ट्रीय शिष्यवृत्ती.............................५२मौलाना आझाद अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्ती...................१२६नेट/जेआरएफ.........................................................................१३७ओबीसी राष्ट्रीय शिष्यवृत्ती.....................................................२८दिव्यांग शिष्यवृत्ती................................................................१८पोस्टर डॉक्टरेट, सिनिअर फेलो, कोठारी शिष्यवृत्ती..................१०एकूण....................................................................................१९६५

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणStudentविद्यार्थी