शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

पोलिसांच्या वाहनाने उडविल्याने १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:09 IST

पोलिसांच्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय महाविद्यालययीन तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आमखास मैदानाजवळील जिल्हा क्षयरोग रुग्णालयासमोर घडला.

ठळक मुद्देआमखास मैदानाजवळील अपघात : उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात रात्री झाला अंत

औरंगाबाद : पोलिसांच्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या १७ वर्षीय महाविद्यालययीन तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आमखास मैदानाजवळील जिल्हा क्षयरोग रुग्णालयासमोर घडला.आकेफा मेहरीन मोहंमद जहीर (वय १७, मूळ रा. नांदेड, ह.मु. आरेफ कॉलनी, औरंगाबाद), असे मृत तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आकेफा ही २२ एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मोपेडने जामा मशिदीकडून टाऊन हॉलकडे जात होती. टाऊन हॉल उड्डाणपुलाच्या अलीकडे जिल्हा क्षयरोग रुग्णालयासमोरून जात असताना मागून आलेल्या कारने आकेफाला धडक दिली. या अपघातात आकेफा गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली. या घटनेनंतर तिला उडविणाऱ्या वाहनाचा चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह तेथून पसार झाला. प्रत्यक्षदर्शींनी जखमी आकेफाला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना बुधवारी (दि.२४) रात्री २ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. आज सकाळी आकेफा हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात आणण्यात आला. तेव्हा तेथे आकेफाचे नातेवाईक आक्रमक झाले. पोलिसांच्या वाहनाने आकेफाला उडविले असून, अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. आरोपी वाहनचालकास तातडीने अटक करा, अशी मागणी त्यांनी केली.याबाबत माहिती कळताच सिटीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब सिनगारे, सहायक पोलीस निरीक्षक एस.के. खताने, उपनिरीक्षक अनंता तांगडे आदींनी घाटी रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची समजूत काढली. या घटनेची चौकशी सुरू असून, अज्ञात वाहनचालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे सिनगारे यांनी सांगितले. अपघात करणारा कोणीही असो, त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याने नातेवाईक शांत झाले.चौकटआकेफाला उडविणारे वाहन पोलिसांचेआकेफा हिला उडवून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले वाहन पोलिसांचे असल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. आकेफा हिला उडविणाºया वाहनाचा चालक पोलिसांच्या युनिफॉर्मवर होता, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असल्याचे पोलीस निरीक्षक सिनगारे यांनी सांगितले. दरम्यान, आकेफाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अंत्यविधीसाठी नातेवाईक नांदेडला रवाना झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसAccidentअपघात