१६८७ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र

By Admin | Updated: June 16, 2014 01:18 IST2014-06-16T00:11:16+5:302014-06-16T01:18:33+5:30

जालना: पोलिस दलातील १३९ रिक्त पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. यात २ हजार ४९१ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

1687 candidates eligible for written examination | १६८७ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र

१६८७ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र

जालना: पोलिस दलातील १३९ रिक्त पदासाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. यात २ हजार ४९१ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. यापैकी १६८७ उमेदवार १८ जून रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक (गृह) आर. टी. वसावे यांनी दिली.
५ जून ते १३ जूनपर्यंत मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. १३९ जागांसाठी ४ हजार ८४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ४०४ महिलांसह ३ हजार ६३२ पुरूष उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली. या चाचणीत एकूण २ हजार ४९१ पात्र उमेदवारांना क्रमांक देण्यात आले होते. मैदानी चाचणींचा निकाल १५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यात आला. यात १६८७ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले.
खुल्या प्रवर्गातील ८० किंवा त्यापेक्षा अधिक गुण तर मागासवर्गीय प्रवर्गातील ५० किंवा त्यापेक्षाअधिक गुण मिळविलेले उमेदवारच लेखी परीक्षेस पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षा १८ जून रोजी सकाळी ६ वाजेपासून येथील कवायत मैदानावर सुरू होणार आहे, अशी माहिती वसावे यांनी दिली. (प्रतिनिधी)
१३९ जागा
खुल्या प्रवर्गासाठी ६२, अनुसूचित जातीसाठी २३, अनु. जमातीसाठी १३, विमुक्ती जमाती ४, भटक्या जमाती ४, भज (क)५, भज (ड)-३, विशेष मागास प्रवर्गासाठी २, इमाव प्रवर्गासाठी २३ असे एकूण १३९ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे.

Web Title: 1687 candidates eligible for written examination