शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या २० मिनिटांत १६५ मोबाइल लंपास; सलग तिसऱ्या फ्रँचायझमध्ये एकाच पद्धतीने चोरी

By सुमित डोळे | Updated: October 18, 2023 11:31 IST

दुकानातील सायरन होता बंद; त्याच दिवशी झाली चोरी, चोरही कारमधून दुकानासमोरच राहिले उभे

छत्रपती संभाजीनगर : कारमधून आलेल्या चोरांनी अवघ्या २० मिनिटांमध्ये दुकानाचे शटर उचकटून मोबाइल शॉपीतून जवळपास १६५ मोबाइल लंपास केले. निराला बाजारमधील एसएस मोबाइल शॉपीमध्ये सोमवारी मध्यरात्री २:३० वाजता ही घटना घडली. सकाळी ११ वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. मोबाइलची संख्या निश्चित होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

राज्यभरात शाखा असलेल्या एस. एस. मोबाइलची निराला बाजारमध्येदेखील एक शाखा आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे चालक दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी ११ वाजता ते परतले असता शटरचे लॉक मधोमध उचकटलेेले आढळले. त्यांनी शटर वर करून पाहिले असता आतील मोबाइल लंपास झालेले होते. घटनेची माहिती कळताच क्रांतीचौक पाेलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके यांनी घटनास्थळी धाव घेतली.

सायरन बंद राहिला, त्याच दिवशी दुकान फुटलेएस. एस. मोबाइल शॉपीला सायरन असून, लाॅक तोडून बळजबरीने प्रवेशाचा प्रयत्न झाल्यास मोठ्याने सायरन वाजतो. परंतु, नेमका सोमवारी रात्रीच सायरन सुरू राहिला नाही. चोरांनी कार थेट त्याच दुकानासमोर आणून उभी करत अवघ्या २० मिनिटांमध्ये दुकान फोडले. दोन दिवसांपूर्वीच दुकानात मोबाइल खरेदी करून आणले होते. त्यामुळे चोरांनी दुकानाची रेकी केली असावी, असा दाट संशय पोलिसांना आहे. चोरीत आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या महागड्या मोबाइलचा समावेश आहे.

यापूर्वी दोन ठिकाणी यांचेच दुकाने फोडलेयापूर्वी तुळजापूर व अन्य काही शहरांमध्ये एस. एस. कम्युनिकेशन श्रृंखलेचीच मोबाइल शॉपी चोरांनी फोडून लाखोंचे मोबाइल चोरून नेले. तुळजापूरमध्ये देखील माल भरल्याच्या दोन-तीन दिवसांमध्येच दुकानात कारमधून आलेल्या चोरांनीच चोरी केली होती. हा सारखा क्रम पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. सोमवारी रात्री चोरांनी वापरलेल्या कारच्या नंबरप्लेटवर स्प्रे मारलेला असल्याने नंबर कळू शकला नाही. दोन पथके चोरांच्या शोधासाठी रवाना झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलAurangabadऔरंगाबाद