शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

औरंगाबाद परिमंडळात दोन महिन्यांत पकडली १६०९ ग्राहकांची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 15:57 IST

महावितरणने थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. 

ठळक मुद्देऔरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लघुदाब वीज ग्राहकांकडे ३४४ कोटी ७९ लाख ३० हजार रुपये एवढी थकबाकी वाढली आहे.

औरंगाबाद : महावितरणच्या परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लघुदाब वीज ग्राहकांकडे ३४४ कोटी ७९ लाख ३० हजार रुपये एवढी थकबाकी वाढली आहे. तथापि, थकबाकी वसुलीची मोहीम सुरूच ठेवली असून, या मोहिमेंतर्गत एप्रिल व मे महिन्यात १ हजार ६०९ ग्राहकांची वीजचोरी पकडण्यात महावितरणला यश आले आहे. 

या संदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्या कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी की, औरंगाबाद शहर मंडळांतर्गत २२१ ग्राहकांनी केलेली वीजचोरी उघडकीस आली, तर ग्रामीण मंडळांतर्गत १२०२ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. जालना एक आणि दोन मंडळांतर्गत १८९ वीज चोऱ्या पकडण्यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना यश आले. वीजचोरी पकडलेल्या ग्राहकांकडे १ कोटी २८ लाख ६० हजार रुपये बिलाची थकबाकी आहे. अधिकाऱ्यांनी वीज चोरांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच यापैकी २३१ जणांनी थकबाकी व दंडाची रक्कम भरण्याची तयारी दाखविली. अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून १९ लाख ४३ हजार रुपये बिल व दंडाची रक्कम वसूल केली. तथापि, ६३ वीज चोरांविरुद्ध औरंगाबादेतील ५ आणि जालन्यातील ३ पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. 

यापूर्वी औरंगाबाद परिमंडळांतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी जालना येथे एकच पोलीस ठाणे होते. अधिकारी वीज चोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यास त्याठिकाणी दिवसभर ताटकळत बसावे लागत होते. त्यामुळे एप्रिल २०१८ पासून वीज चोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत छावणी आणि सिडको पोलीस ठाणे, तर ग्रामीणमध्ये चिकलठाणा, सिल्लोड आणि गंगापूर अशी पाच पोलीस ठाणे देण्यात आले, तर जालना जिल्ह्यासाठी सदर बाजार पोलीस ठाणे, भोकरदन पोलीस ठाणे आणि परतूर पोलीस ठाणे देण्यात आले आहेत, या दोन जिल्ह्यांमध्ये यावेळी पहिल्यांदाच वीज चोरांविरुद्ध ६३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

मोहीम अधिक गतिमान करणारयासंदर्भात मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, एप्रिल व मे महिन्यांमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली आहे. ती वसूल करणे व वीज चोरांविरुद्ध मोहीम गतिमान करण्यासाठी पथके तैनात केली जाणार आहेत. ३० जून रोजी या पथकांचे आदेश काढले जातील. पुढील महिन्यापासून सुरुवातीला १ ते १० तारखेपर्यंत वीज चोरांविरुद्ध मोहीम राबविली जाईल, तर उर्वरित दिवसांमध्ये ही पथके थकबाकी वसुली करतील. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणtheftचोरीMONEYपैसा