शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

१६ वर्षीय तरुणीची दारुड्या रिक्षाचालकाने केली छेडछाड; घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी घेतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 11:41 IST

औरंगाबादमध्ये भरदुपारी घडला थरार, आरोपीला अटक

औरंगाबाद : जालना रोडवरील मोंढा नाका सिग्नलवरून रिक्षात बसलेल्या १६ वर्षीय तरुणीची दारुड्या रिक्षाचालकाने छेडछाड केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने भरधाव रिक्षातून उडी घेतली. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी आरोपीला बेड्या  ठोकल्या.

आनंद अंबादास पहुलकर (५०) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडित तरुणी रक्षाबंधनासाठी मामाच्या घरी आली होती. शनिवारी क्लासला जाण्यासाठी मामाच्या मुलाने तिला मोंढा नाका येथे आणून सोडले. तेथून ती ऑटोरिक्षात बसली व रामगिरी हॉटेलजवळ जायचे असल्याचे सांगितले. यावर तो म्हणाला, तुला तेथे सोडणार नाही, दुसरीकडे घेऊन जाणार आहे. लगेच मागे वळून त्याने तरुणीच्या डाव्या हाताला पकडण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने भरधाव रिक्षातून उडी घेतली. यात तिचे नाक, हनुवटी व कानाच्या पाठीमागे गंभीर दुखापत झाली. 

अल्पवयीन मुलीस पळवून केला बलात्कार; तीन संशयित राहिले बाजूला, निघाला भलताच आरोपी

तरुणीने उडी टाकल्यानंतर चालकाने रिक्षा थांबवली. त्यानंतर तो तिच्याकडे चालत आला. तरुणी ‘वाचवा वाचवा’ अशी मोठ्याने ओरडत दुसरीकडे पळत सुटली. घटनास्थळी अनेक रिक्षा थांबल्या. गर्दी जमू लागल्यानंतर चालक घटनास्थळावरून रिक्षा घेऊन पळून गेला. जखमी तरुणीला एका तरुणाने मदत करीत मामाला घटनास्थळी बोलावून घेतले. यानंतर तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.तरुणी मोंढा नाक्याकडे पळून जाऊ लागली. तेवढ्यात सायकलवर जात असलेला नीलेश सेवेकर हा तरुण तिच्या मदतीला धावून आला. त्याने तरुणीला मी तुझा भाऊ आहे. काय झाले ते सांग, असे विचारले. तरुणीने भावाचा मोबाइल नंबर दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस