शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

बालाजींची सेवा घडवितो म्हणून १५८ जणांना फसविले

By राम शिनगारे | Updated: April 22, 2023 12:12 IST

बेगमपुऱ्यात गुन्हा दाखल; दिलेला धनादेशही झाला अनादरीत

छत्रपती संभाजीनगर : बालाजीची सेवा घडवितो म्हणून १५८ महिला, पुरुषांकडून प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये घेऊन त्यांची ५ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्या ज्ञानेश्वर निकमच्या विरोधात बेगमुपरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.

वैशाली येलजाळे (रा.बेगमपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सप्टेंबर २०२२ मध्ये यांना बालाजी सेवेला जालना येथील शाम विनायक जोशी (रा. समर्थनगर, जालना) हे घेऊन जात असल्याची माहिती मैत्रिणीकडून मिळाली. त्या मैत्रीणीने त्यांचा नंबरही दिला. त्यावर फोन लावल्यानंतर त्यांनी बालाजी सेवेसाठी आधारकार्ड व ३ हजार ५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. वैशाली यांनी पुन्हा जोशींना फोन लावल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर निकम याचा मोबाईल नंबर देत सर्व कामे तेच पाहत असल्याचे सांगितले. त्यानुसार १६ सप्टेंबर २०२२ रोजी निकम यास ७ जणींच्या बालाजी सेवेला जाण्यासाठी १४ हजार रुपये पाठविले. त्यानंतर फिर्यादीच्या ओळखीच्या अनेक महिलांनी बालाजी सेवेसाठी पैसे जमा केले. निकम याने १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी बेगमपुऱ्यातील ब्राम्हण गल्लीतील जगदंबा मंदिर येथे महिलांची बैठकही घेतली. त्या बैठकीत त्याने सेवाकालावधींमध्ये पाळायचे नियम, प्रवासासंबंधी सूचना व तेथील वातावरणाची माहिती दिली. तोपर्यंत निकम यास ५ लाख ५३ हजार रुपये दिले होते. २४ जानेवारी रोजी निकम याने येलजाळे यांच्यामार्फत पैसे दिलेल्या केवळ ६ लोकांना सेवेसाठी बालाजीला घेऊन गेले. त्यावर विचारणा केली असता उर्वरित लोकांना १ फेब्रुवारीला नेण्याचे आश्वासन दिले. तेही निकमने पाळले नाही.

पोलिस ठाण्यात दिला साडेपाच लाखांचा धनादेशआरोपी निकमने बालाजी सेवेला घेऊन गेलेल्या ६ लोकांना ६ फेब्रुवारी रोजी परत छत्रपती संभाजीनगरला आणले. तेव्हा बाबा पेट्रोल पंप येथे निकमला भेटण्यासाठी फिर्यादीसह काही महिला गेल्या. त्यांना तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे निकमला पकडून बेगमपुरा ठाण्यात आणले. त्याठिकाणी त्याने ५ लाख ५३ हजारांचा धनादेश फिर्यादीला दिला. त्यामुळे तेव्हा त्यास सोडून दिले. त्यानंतर हा धनादेश वटण्यासाठी बँकेत टाकल्यानंतर अनादरित झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद