शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये १५५५ ‘नकलाकार’ विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 23:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या घेतलेल्या परीक्षांमध्ये तब्बल १५५५ विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला (कॉपी) करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या नकलाकार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया परीक्षा विभागाने सुरू केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या घेतलेल्या परीक्षांमध्ये तब्बल १५५५ विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला (कॉपी) करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या नकलाकार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया परीक्षा विभागाने सुरू केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना एप्रिल महिन्यात सुरुवात झाली होती. विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ जूनपर्यंत सुरू होत्या. या परीक्षेच्या कालावधीत भरारी पथकांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी समोर आली आहे. परीक्षेदरम्यान तब्बल १५५५ विद्यार्थ्यांना नकला करताना पकडण्यात आले. यातील काही विद्यार्थ्यांचे मोबाईलही जप्त केले आहेत. कारवाई केलेल्या परीक्षा केंद्रांवरून परीक्षा विभागाकडे बंद लिफाफ्यात त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. हे लिफाफे फोडल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांकडे नकला केल्याच्या प्रकरणी खुलासा मागविण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे खुलासे मिळाल्यानंतर संबंधित नकालाचा प्रकार आणि खुलासे एका समितीसमोर मांडण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. या १५५५ विद्यार्थ्यांमध्ये बी. ए. अभ्यासक्रमाचे ५०१ विद्यार्थी, बी.एस्सी.३९०, बी.कॉम. २०५, एम. ए. ९५, एम.एस्सी. ५७, एम.कॉम. ५६, बीसीएस ६३, बीबीए ३५, व्यावसायिक अभ्यासक्रम ८० आणि अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या ७३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.-----------

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठ