शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१५० टन बटाटे मातीमोल भावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:04 IST

गुरुवारी जाधववाडीतील अडत बाजारात आग्ऱ्याहून तब्बल १५० टन जुन्या बटाट्याची आवक झाली. एक क्विंटल बटाट्याला २५० रुपये गाडीभाडे लागले अन् येथे तोच बटाटा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाला. मातीमोल भावात बटाटा खरेदी करण्यासाठी सकाळी हजारो ग्राहक जमले होते. तरीही मोठ्या प्रमाणात बटाटे विक्रीविना पडून होते.

ठळक मुद्देहालबेहाल : गाडीभाडे प्रति क्विंटल २५० रुपये अन् विक्री ३०० रुपयांत

औरंगाबाद : गुरुवारी जाधववाडीतील अडत बाजारात आग्ऱ्याहून तब्बल १५० टन जुन्या बटाट्याची आवक झाली. एक क्विंटल बटाट्याला २५० रुपये गाडीभाडे लागले अन् येथे तोच बटाटा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाला. मातीमोल भावात बटाटा खरेदी करण्यासाठी सकाळी हजारो ग्राहक जमले होते. तरीही मोठ्या प्रमाणात बटाटे विक्रीविना पडून होते.आग्रा येथे बटाट्याचे शेकडो शीतगृह आहेत. तेथून देशभरात बटाट्याचा पुरवठा होतो. आजघडीला शीतगृहामध्ये हजारो टन बटाटे शिल्लक आहेत. नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने शीतगृहचालकांनी जुने बटाटे शीतगृहातून बाहेर काढणे सुरू केले आहे. तेथे जागेवर फुकटात बटाटे मिळत आहेत. येथील अडत्यांना फक्त तेथून बटाटे आणण्याचे गाडीभाडे, हमाली द्यावी लागत आहे. व्यापारी मुजीब शेठ यांनी सांगितले की, आज जाधववाडीत १५० टन बटाट्याची आवक झाली. जुन्या बटाट्याचे वेफर्स, चिवडा तयार करता येत नाही. खाण्यास गोड असतात यामुळे या बटाट्याला मागणी कमी असते. आग्ºयाहून एका मालट्रकमध्ये २० टन बटाटे आणले जातात. २५० रुपये प्रतिक्विंटल गाडीभाडे लागले. येथे ३०० रुपये क्विंटलने बटाटे विक्री झाले. आज अडत बाजारात ३०० ते ६०० रुपये क्विंटलपर्यंत बटाटे विक्री झाले. यात ८० टक्के बटाटे हा ३०० रुपये क्विंटलने विक्री झाले.इंदूरमध्ये नवीन बटाट्याची आवक सुरू झाली आहे. हे बटाटे वेफर्स, चिवडा करण्यासाठी उपयोगाचे असतात. मात्र, जागेवरच ८०० ते १ हजार रुपये प्रति क्विंटलने नवीन बटाटे विकले जात आहेत. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात कमी भावातील जुने बटाटे शिल्लक आहेत. ते विक्री झाल्यानंतर नवीन बटाटे मागविण्यात येतील.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद