शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

माहिती लपवून कंपनीची विक्री करत उद्योजकांची १५ कोटी रुपयांची फसवणूक

By राम शिनगारे | Updated: June 24, 2023 20:47 IST

अकोल्यातुन दोन आरोपी ताब्यात; एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

छत्रपती संभाजीनगर : जिनिंग प्रेसिंग, कापसाचा व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांची अकोला येथील कंपनी खरेदीमध्ये १४ कोटी ८२ लाख ६८ हजार ४७० रुपयांचा फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अकोला, अमरावतीतील तीन जणांच्या विरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपींमध्ये नितीन हिरदास पाटील, संदीप हरिभाऊ पुंडकर (दोघे रा. अकोला) आणि संजय जाधव (रा. अमरावती) यांचा समावेश आहे. सिडको, एन १ येथील रहिवाशी संजय त्रिलोकचंद गाेयल (अग्रवाल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीची चिकलठाणा एमआयडीसीमध्ये ऋषी फायबर्स प्रा.लि. नावाची कंपनी आहे. ही कंपनी जिनींग प्रेसिंग व कापसाच्या संबंधित व्यवहार करते. जानेवारी २०२१ मध्ये अकोला येथील एका ऐजटाने जे.जे. फाईन स्पन प्रा. लि. अकोला ही कंपनी लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडली असून, ती विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्यानुसार ऋषी फायबर्सच्या संचालकांची बैठक झाल्यानंतर फिर्यादीचे मोठे भाऊ गोपाल अग्रवाल हे एजंटला घेऊन कंपनी पाहण्यासाठी गेले. 

त्याठिकाणी कंपनी संचालक असलेल्या आरोपींसोबत बैठक झाली. त्यात ऋषी फायबर्सने जे.जे. फाईन स्पन कंपनी ४१ कोटी २५ लाख रुपयांमध्ये खरेदी केली. तेव्हा स्पन कंपनी हस्तांतरणाचे अधिकार व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांना दिले. कंपनीच्या हस्तांतरणासाठी वेळ लागणार असल्यामुळे नितीन पाटील यांनी देणेदारांचे पैसे देण्यासाठी ७ कोटी १४ लाख ५१ हजार रुपये देण्याची विनंती केली. त्यानुसार ऋषि फायबर्सच्या बँक खात्यातुन ७ कोटी १४ लाख ५१ हजार रुपये देण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

हस्तांतरणानंतर फसवणूक केल्याचे उघडठरल्याप्रमाणे कंपनी हस्तांतरीत करण्यात आली. त्यानंतर विविध बँकांचे देणे, थकीत जीएसटी, आयकर, डीजीएफटीसह इतर शासकीय विभागाचे पैसेही थकीत असल्याचे कंपनीला नोटीसा आल्यानंतर उघडकीस आले. आरोपींनी कंपनीचा चुकीचा ताळेबंद दाखवला. तसेच कंपनीची काही देणीही लपवून ठेवल्याचे उघड झाले. या सर्वांमध्ये ऋषी फायबर्स कंपनीची एकुण १४ कोटी ८२ लाख ६८ हजार ४७० रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कंपनीच्या सचालकांनी एम. सिडकोत गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद