शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रागाच्या भरात घर सोडलेली १४ बालके पालकांच्या स्वाधीन; रेल्वे पोलिसांची विधायक कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 19:48 IST

रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १४ बालकांना औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले

औरंगाबाद : हट्ट न पुरविल्याने वा इतर किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १४ बालकांना औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

अभ्यासाचा कंटाळा, टीव्ही पाहू न देणे, एखादी इच्छा पूर्ण न होणे वा आई-बाबा रागावले तर लहान मुले याचा राग धरून घरातून निघून जात असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. मुंबई वा उपनगरांमध्ये अशी अनेक उदाहरणे गत काही वर्षांत आढळून आलेली आहेत. मात्र, पोलिसांची सतर्कता व सजगतेमुळे ही बालके त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कार्यामुळे या मुलांचे भवितव्य धोक्यात जाण्यापासून वाचले आहे. 

औरंगाबाद रेल्वे स्थानकावर जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१८ या काळात तब्बल १४ बालके संशयास्पद स्थितीत रेल्वे पोलिसांना आढळून आली. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर पालकांना बोलावून घेत दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर ही बालके पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील एका खाजगी वसतिगृहात राहणारा व इयत्ता पाचवी शिकणारा सुरेश (नाव बदलले आहे) हा वसतिगृहातील लोक त्रास देतात म्हणून तेथून पळून आला होता. सुरेश मूळचा परतूर तालुक्यातील डोल्हारा येथील रहिवासी असून, शेतकरी असलेल्या त्याच्या पालकांनी केवळ शिक्षणासाठी त्याला औरंगाबाद शहरात ठेवले आहे. रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या मुलाची चौकशी केली. त्यानंतर एनजीओला फोन करून याची माहिती दिली. वसतिगृह चालकाला याची कल्पनाही नव्हती. रेल्वे पोलिसांनी सुरेशचे पालक, वसतिगृहचालक आणि एनजीओला  बोलावले. 

सर्वांचे समुपदेशन केल्यानंतर सुरेशची पुन्हा वसतिगृहात रवानगी करण्यात आली. ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आली नसती, तर या मुलाचे काय भवितव्य असते, याचा विचारच केलेला बरा. औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी आठ महिन्यांत अशी १४ बालके शोधली. त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ही कार्यवाही एएसआय दिलीप कांबळे, एसआयपीएफ एम.जी. कसबे, डी.आर. नरवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली. 

चाईल्ड हेल्पलाईनचा आधार१०९८ या क्रमांकावरील चाईल्ड हेल्पलाईनच्या मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यासाठी आधार घेतला जातो. देशभरात विविध स्वयंसेवी संस्था या माध्यमातून कार्यरत असून, हेल्पलाईनद्वारे समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होतात. या हेल्पलाईनमुळे अनेक बालके सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. 

स्थानकासह परिसरात कुठलीही संशयास्पद व्यक्ती आढळून आली, तर त्याची चौकशी केली जाते. गत आठ महिन्यांत १४ बालके स्थानकावर आढळून आली. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.  - अरविंदकुमार शर्मा, निरीक्षक, रेल्वे पोलीस दल, औरंगाबाद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनPoliceपोलिस