शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

मराठवाड्यात पहिल्या दिवशीच १३.३२ लाख वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 5:26 PM

यंदा सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि.१) मराठवाड्यात १३.३२ लाख रोपटे लावण्यात आल्याची आॅनलाईन माहिती वनविभागाकडे आल्याने उत्साह वाढला आहे. 

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : यंदा सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि.१) मराठवाड्यात १३.३२ लाख रोपटे लावण्यात आल्याची आॅनलाईन माहिती वनविभागाकडे आल्याने उत्साह वाढला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षलागवडीसाठी केलेल्या घोषणेला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून भरभरून प्रतिसाद मिळाला. मे आणि जून महिन्यात वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाने बैठका घेऊन वृक्षलागवडीसाठी जनजागृती केली. यंदा कृषी विभागामार्फत घेतलेल्या फळबागांचा देखील वृक्षलागवडीत समावेश केला जाणार आहे. बांबू शेतीचाही समावेश झालेला आहे.

पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभाग घेतलाच पाहिजे. ज्याप्रमाणे कुटुंबाचे संरक्षण केले जाते, त्याचप्रमाणे वृक्षारोपण केल्यानंतर त्या रोपट्याला जपावे, त्याचे संगोपण करण्याची जबाबदारीदेखील देण्यात आलेली आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, स्वयंसेवी संस्थादेखील या उपक्रमात सरसावल्या आहेत. 

या मोहिमेत मराठवाड्यास २.९२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून ते १५ दिवसांत साध्य करावयाचे आहे, असे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. के. महाजन, उपवनसंरक्षक वडसकर यांनी सांगितले. सामाजिक वनीकरणचे नितीन गुदगे म्हणाले की, शाळा व सामजिक संस्थांचा या उपक्रमात मोठा सहभाग राहणार आहे.

मराठवाड्यासाठी दिलेले उद्दिष्ठपूर्तीसाठी यावर्षी गृहनिर्माण सोसायट्या, रेशन दुकानदारासह सर्व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेतला आहे. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी मराठवाड्यातील विविध जिल्हा व तालुकास्तरावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री परिसरात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. 

‘सीड बॉल’चे लक्ष्य नदीकाठ व डोंगरऔरंगाबाद येथील साकला नर्सरीतर्फे १ ते १० जुलैपर्यंत ५० हजार सीड बॉल तयार करण्यात येतील. स्थानिक संस्थादेखील सीड बॉल बनविण्याचा उपक्रम राबवित आहेत. १ जुलै रोजी सीड बॉल बनविण्याच्या कार्यशाळेत  विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता. हे सीड बॉल नदीकाठी तसेच डोंगर आणि मोकळ्या जागेवर टाकले जाणार आहेत.

मराठवाड्यातील आकडेवारी :औरंगाबाद - ९० हजार ८१० जालना - ५२ हजार ८३८ बीड -२ लाख ६६ हजार ७६५हिंगोली -१ लाख २४ हजार ८७२नांदेड -६७ हजार ४५८उस्मानाबाद- २ लाख ७४ हजार ८८७लातूर - ३ लाख ३८ हजार ७परभणी - १ लाख १७ हजार ६१असा एकूण १३ लाख ३२ हजार ६९८ वृक्षांची लागवड झाल्याची आॅनलाईन आकडेवारी वनविभागाकडे आली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकार