शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

१३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:51 PM

: थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देथकबाकी वसुली मोहीम तीव्र : परिमंडळात १३२ कोटी ८ लाख रुपये थकबाकी

औरंगाबाद : थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.यापैकी मागील पंधरवड्यात थकबाकीपोटी १९४३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. या ग्राहकांकडे ३ कोटी ३७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. याशिवाय ११ हजार १५९ ग्राहकांकडे २३ कोटी ४६ लाख रुपये एवढी थकबाकी असून, त्यांचा तात्पुरता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यापैकी औरंगाबाद शहर मंडळातील २३७८ ग्राहकांकडे ५ कोटी ५८ लाख रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडळातील ४०३२ ग्राहकांकडे ६ कोटी ६४ लाख रुपये थकबाकी, तर जालना मंडळातील ४७४९ ग्राहकांकडे १० कोटी ८३ लाख रुपये थकबाकी आहे.या मोहिमेत औरंगाबाद शहर मंडळात ३४०० ग्राहकांकडून २ कोटी ३९ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळात ५१९२ ग्राहकांकडून ४ कोटी ४ लाख रुपये, तर जालना मंडळात २५९६ ग्राहकांकडून ३ कोटी ४४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. औरंगाबाद परिमंडळात ११ हजार १८८ ग्राहकांकडून १० कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली. दरम्यान, थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.चौकट ...परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांमध्ये थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बिल न भरणाºया ४३ हजार ३०६ वीज ग्राहकांकडे १३२ कोटी ८ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये औरंगाबाद शहर मंडळांतर्गत ११ हजार ४५९ ग्राहकांकडे ३२ कोटी ९४ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत १७ हजार ३ ग्राहकांकडे ५१ कोटी ६६ लाख, तर जालना मंडळामध्ये १४ हजार ८४४ ग्राहकांकडे ४७ कोटी ४८ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजनांच्या १७७९ जोडण्या असून, त्यांच्याकडे ५४ कोटी ५० लाख रुपये थकबाकी असून, शहरी भागातील पथदिव्यांच्या ४४८ जोडण्यांकडे ८ कोटी ७९ लाख रुपये थकबाकी आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण