शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

छत्रपती संभाजीनगरात खर्चाच्या तुलनेत पाणीपुरवठ्यात दरवर्षी १२५ कोटींची तूट

By मुजीब देवणीकर | Updated: December 22, 2023 18:40 IST

देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जवळपास १४ लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी तब्बल १५० कोटी रुपये खर्च करावे लागतात. खर्चाच्या तुलनेत १२५ कोटींची किमान तूट सहन करावी लागते. दोन वर्षांपूर्वी पाणीपट्टी खूप जास्त होत असल्यामुळे महापालिकेने ४ हजार ५० वरून पाणीपट्टी २ हजार रुपयांवर आणली. त्यानंतरही नागरिकांकडून प्रतिसाद नाही. फेब्रवारी २०२४ मध्ये ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी सुरू होईल. या योजनेचा वार्षिक खर्च किमान ५० कोटीने वाढणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास खर्च १३८ कोटींपर्यंत जाणार आहे.

देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत. या तुलनेत पाणीपट्टी वसुली जेमतेम २५ ते ३० कोटी होते. १२५ कोटींची तूट प्रशासनाला सहन करावी लागते. दोन महिन्यांनंतर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी सुरू होणार आहे. जुन्या तिन्ही योजना सुरू ठेवल्या तर खर्च ३०० कोटींपर्यंत जाईल.

पाणीपट्टी वसुलीचे आकडेवर्षे------------वसुली कोटीत२०१८-१९------२६.२६२०१९-२०------२९.२९२०२०-२१-------२९.०६२०२१-२२-------३७.५३२०२२-२३--------२५.८२२०२३-२४--------१५.२८ (१८ डिसेंबरपर्यंत)

पाणीपट्टी अर्ध्यावर; तरी वसुली नाहीसमांतर जलवाहिनी योजनेसाठी महापालिकेने पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये केली होती. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी छत्रपती संभाजीनगर महापालिकेची असल्याची ओरड होऊ लागली. त्यामुळे प्रशासनाने २०२२ मध्ये पाणीपट्टी अर्ध्यावर म्हणजेच, २ हजार रुपये केली. त्यानंतरही नागरिक पाणीपट्टी भरायला तयार नाहीत.

सर्वसामान्य नागरिकांचा रोषमहापालिकेने खंडपीठात लेखी स्वरूपात प्रत्येक वसाहतीला पाचव्या दिवशी पाणी देण्याचे आश्वासन दिले. हे वेळापत्रक पाळले जात नाही. आठवड्यातून एकदाच नागरिकांना पाणी मिळते.

नळांना मीटर बसविण्याची योजनानवीन पाणीपुरवठा योजनेचा खर्च २७४० कोटी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्यानंतर, प्रत्येक नळाला मीटर बसवा, असे योजनेत म्हटले आहे. अद्याप तरी मीटर कोण बसविणार, हे उघड नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २४ तास ७ दिवस पाणी मिळेल, असा दावा करीत आहे. त्यासाठी मीटर बंधनकारक असल्याचे प्राधिकरणचे म्हणणे आहे.

खर्चाचे अंदाजपत्रक तयारनवीन पाणीपुरवठा योजना पूर्णपणे राबविण्यासाठी वीज, केमिकल, कर्मचारी हा खर्च गृहीत धरला आहे. दरवर्षी १३८ कोटी रुपये खर्च राहील.- दीपक काेळी, कार्यकारी अभियंता, मजीप्रा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका