शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील १२ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी काढला रबीचा पीक विमा, गतवर्षीच्या तुलनेत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 17:31 IST

राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा रब्बी हंगामातील विविध पिकांसाठी आजपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील १२ लाख ४२ हजार ६९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यामुळे मराठवाड्यातील १६ लाख ८५ हजार ७३० हेक्टरवरील पिकांना विम्याचे छत्र लाभले.

राज्य सरकारने खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा केवळ एक रुपयात उतरविण्याची योजना दोन वर्षांपासून सुरू केली आहे. रब्बीतील काही पिकांचा विमा उतरविण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत होती. काहींसाठी १५ डिसेंबर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांसाठी तब्बल २ लाख २० हजार ४३२ विमा अर्ज दाखल केले आहेत. यामुळे जिल्ह्यातील १ लाख २० हजार ४९४ हेक्टरवरील पिके विमा संरक्षित झाली आहेत. जालना जिल्ह्यातील १ लाख ९३ हजार ९४९ शेतकऱ्यांनी २ लाख ५२ हजार ५८० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. बीड जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार १२१ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ६५० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. धाराशिव जिल्ह्यातील १ लाख ९ हजार १८९ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवीत त्यांच्या १ लाख ७७ हजार ६१० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला. हिंगोली जिल्ह्यातील ५९ हजार २१० शेतकऱ्यांनी ८४ हजार ५४० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. लातूर जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार १६७ शेतकऱ्यांनी २ लाख ४४ हजार ७२० हेक्टरवरील पिकांना विमा संरक्षण दिले. नांदेडमधील १ लाख ८४ हजार १९६ शेतकऱ्यांनी २ लाख ३२ हजार ७२० हेक्टरवरील पिकांचा विमा उतरविला. परभणी जिल्ह्यातील २ लाख ४२ हजार ३४९ शेतकऱ्यांनी ३ लाख २८ हजार ४३० हेक्टरवरील पिकांचा विमा काढला.

गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात सव्वा लाख कमी अर्जगतवर्षी कमी पाऊस होता, यामुळे रब्बी हंगामातील पेराही कमी असताना जिल्ह्यातील ३ लाख ४८ हजार २४३ पीक विम्याचे अर्ज कंपनीकडे शेतकऱ्यांनी दाखल केले होते. गतवर्षी १ लाख ७७ हजार ९५९ हेक्टरवरील पिके संरक्षित होती. यावर्षी पुरेशा पावसामुळे रब्बीचे क्षेत्र वाढले. असे असताना आजपर्यंत जिल्ह्यातील ९८ हजार ९०१ शेतकऱ्यांनीच २ लाख२० हजार ४३२ विमा अर्ज भरले. यामुळे १ लाख २० हजार ४९४ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrop Insuranceपीक विमाMarathwadaमराठवाडा