शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

विद्यापीठातील १,८१२ विद्यार्थ्यांना १२ कोटी २२ लाखांची शिष्यवृत्ती मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 15:30 IST

राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेत सर्वाधिक अनुदान

- राम शिनगारे 

औरंगाबाद :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांमधून २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी १,८१२ विद्यार्थ्यांना १२ कोटी २२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. इतर विद्यापीठांच्या तुलनेत हा निधी निश्चितच समाधानकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकार, राज्य सरकारकडून संशोधन, पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. विविध ११ शिष्यवृत्तीअंतर्गत २०१७-१८ साली १,८१२ विद्यार्थ्यांना सर्वाधिक १२ कोटी २२ लाख रुपये मिळाले आहेत. याशिवाय विद्यापीठ प्रशासनाकडून संशोधन करणाऱ्या गोरगरीब, शेतमजूर विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ६ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येते. त्याचा आकडाही वेगळाच असल्याचेही डॉ.चोपडे यांनी सांगितले.

पीएच.डी.,एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे राजीव गांधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी विद्यापीठातील ३५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. यासाठी ५ कोटी ९१ लाख ३२ हजार ५०० रुपये मंजूर झाले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील मौलाना आझााद राष्ट्रीय शिष्यवृृत्ती २१ विद्यार्थ्यांना मिळाली. यात ३ कोटी ५४ लाख ७९ हजार रुपये मिळाले. नेट-जीआरएफ शिष्यवृत्ती दोन विद्यार्थ्याला मिळाली आहे. यासाठी ३३ लाख ७९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. पोस्ट डॉक्टरेट शिष्यवृत्ती एका विद्यार्थ्याला मंजूर झाली आहे. यासाठी १६ लाख ८९ हजार ५०० रुपये मिळाले आहते.  

याशिवाय गव्हर्नमेंट आॅफ इंडिया पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप ७८७ विद्यार्थ्यांना ८४ लाख ९८४ रुपये, २३ विद्यार्थ्यांना फ्रिशिपच्या माध्यमातून ४ लाख ३३ हजार, स्वधार शिष्यवृत्तीतून १२६ विद्यार्थ्यांना ६० लाख १० हजार २०० रुपये मिळाले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती २५१ विद्यार्थ्यांना १७ लाख २० हजार ५९२ रुपये मिळाले. पंडित दीनदयाल उपाध्याय शिष्यवृत्ती ३४ विद्यार्थ्यांना १७ लाख रुपये, गव्हर्नमेंट आॅफ पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप ९२ विद्यार्थ्यांना मिळाली. त्यासाठी ६ लाख ४९ हजार ४३० रुपये मिळाले असल्याचेही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सांगितले. विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मिळविण्याचे कौशल्य आहे. राष्ट्रीयस्तरावरील शिष्यवृत्ती मिळविण्यातही आपले विद्यार्थी आघाडीवर असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

मराठवाड्यातील विद्यार्थ्यात हे स्पिरिट मोठेविद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजनांमधून मागील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. याशिवाय विद्यापीठ प्रशासन संशोधन करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांना आणि गोल्डन ज्युबिली शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिष्यवृत्ती मिळविण्याचे स्पिरिट मोठ्या प्रमाणात आहे.- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीfundsनिधी