शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

औरंगाबादेत सुखना धरणावर विषबाधेने १२ पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 19:34 IST

सुखना हा पाणथळीचा तलाव असून, येथे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येतात.

औरंगाबाद : सुखना धरणावर गुरुवारी कवड्या टिवळा (सँडरलिंग) प्रजातीचे १२ पक्षी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक आणि प्रतीक जोशी गुरुवारी दुपारी सुखना तलावावर गेल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. एका अत्यवस्थ पक्ष्याला पाण्यातून बाहेर काढून वाचविण्यात यश आले आहे.  या घटनेमुळे तलावातील अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आला आहे. 

सुखना हा पाणथळीचा तलाव असून, येथे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येतात. साधारण १४४ प्रजातीचे पक्षी येथे आढळले आहेत. हे सर्व पक्षी पाण्यातील कीटक, जलचर, जलवनस्पती खाऊन, तसेच विष्टेद्वारे पिकांना खत पुरवीत असतात. अलीकडे या तलावात अतिक्रमित शेतीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, त्याचा फटका या पक्ष्यांना बसतो आहे. 

या पाणथळीत झडपे तोडून खरबुजाची शेती केली जात आहे. या खरबुजांवर केली जाणारी फवारणी आणि रासायनिक खतांमुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. यातूनच या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. किशोर पाठक यांनी ‘लोकमत’ला दिली. या तलावात शेतीसोबतच अवैध मासेमारीदेखील सुरू असल्याचे पाठक यांनी सांगितले. 

अतिक्रमणधारकांवर कारवाईची मागणीशेती आणि अवैध मासेमारीच्या माध्यमातून सुखना तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचा मोठा फटका पक्ष्यांना बसतो आहे. त्यामुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी डॉ. किशोर पाठक यांनी केली.

जैवविविधतेने संपन्न असलेला तलावऔरंगाबादपासून १८ कि.मी. अंतरावर हा पाणथळीचा तलाव आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या तलाव परिसरात पक्षी, कीटक, सरडे, साप, जंगली मांजर, कोल्हा, रानडुक्कर, ४५ प्रकारची फुलपाखरे, १६४ प्रकारचे पक्षी आढळतात. रंगीत करकोचा, सारंग, नदी सूरय, चार प्रकारचे बगळे, उघड्या चोचीचा करकोचा, मोहोळघार, लालशिरी गरूड आदी १०० प्रकारचे स्थानिक पक्षी आढळतात. 

मच्छीमारांच्या जाळ्यात ‘सारंग’ अडकलामच्छीमारांनी टाकलेल्या जाळ्यात सारंग (ग्रे हेरॉन) हा पक्षी अडकल्याचे गुरुवारी आढळले. जखमी झालेल्या या पक्ष्याची डॉ. किशोर पाठक यांनी जाळे कापून सुटका केली. 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यDamधरणdam tourismधरण पर्यटन