शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

देवगिरी साखर कारखान्याच्या ११०० कर्मचाऱ्यांना तब्बल १३ वर्षानंतर मिळाला थकीत पगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 18:05 IST

११०० कर्मचाऱ्याना बारा वर्षाचे साडेअकरा कोटी मिळाले 

फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्याचे तेरा वर्षा पूर्वीचे भविष्य निर्वाह निधी व थकीत पगार ११ कोटी ५० लाख रुपये रुपये प्राप्त झाले असून ते ११०० कर्मचाऱ्यांना वाटप केले जात आहेत.  यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून आनंदाचे वातावरण आहे. 

फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर या दोन तालुक्याच्या कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांच्या मालकीचा देवगिरी सहकारी साखर कारखाना हा  एकमेव सहकारी कारखाना आहे. एकेकाळी फुलंब्री शहराच्या वैभवात भर पडणारा हा कारखाना राजकीय हस्तक्षेपामुळे बंद पडून कर्जबाजारी झाला. २०१२ पासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे. येथे ११०० कर्मचारी काम करीत होते. त्या कर्मचाऱ्याचे २००० ते २०१२ पर्यंतचा पगार थकीत होता. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही त्या कार्यालयाला मिळाली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून अवसायकच्या ताब्यात कारखाना आहे. दरम्यान, देवगिरी कारखान्याची जमीन समृद्धी महामार्गा मध्ये गेल्याने यातून २४ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम ऋण वसुली प्राधिकरण विभागाकडे होती. थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळावी म्हणून कर्मचारी वर्गाकडून सतत मागणी केली जात होती. या मागणीचा अवसायक श्रीराम सोन्ने यांनी पाठपुरवा केला. यानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली आहे. देवगिरी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या ११०० कर्मचाऱ्यांना थकीत पगारा पोटी साडेपाच कोटी रुपये प्राप्त झाले असून ते वाटप सुरु आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीची देखील साडेपाच कोटी रुपये ही ऋण वसुली विभागाने सबंधित कार्यालयाला दिले. एकूण ११ कोटी रुपये प्राप्त झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती कामगार प्रतिनिधी दादा सय्यद यांनी दिली. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSugar factoryसाखर कारखानेAgriculture Sectorशेती क्षेत्र