शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

मराठवाड्यास ४५ हजार कोटींचे पॅकेजच्या घोषणेस ११ महिने पूर्ण; अध्यादेशाच्या पुढे तरतूद काय?

By विकास राऊत | Updated: August 10, 2024 11:59 IST

पुढील महिन्यांत होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय प्रशासनाने सगळ्या विभागांसाठी केलेल्या घोषणा आणि आजवर झालेली तरतूद, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विभागातील आठ जिल्ह्यांची झोळी ४५ हजार कोटींद्वारे भरण्याची घोषणा केली. या पॅकेजच्या घोषणेला ११ महिने झाले आहेत. या कामांप्रकरणी अध्यादेश काढण्याशिवाय ठाेस तरतूद शासनाकडून झालेली नसल्याची ओरड सुरू आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या पॅकेजचा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनादेखील विसर पडला होता. आता विधानसभा निवडणुका आणि पुढील महिन्यांत होणाऱ्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर विभागीय प्रशासनाने सगळ्या विभागांसाठी केलेल्या घोषणा आणि आजवर झालेली तरतूद, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे सगळ्या घोषणा आणि सद्य:स्थिती याचा अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीतील घोषणांनंतर ११ महिन्यांत विभागाला काय मिळाले, याची वस्तुस्थिती समोर येईल. ४५ हजार कोटी सर्व विभागांचे व १४ हजार ४० कोटी पश्चिम वाहिन्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी स्वतंत्र तरतुदीच्या घोषणेसह सुमारे ५९ हजार कोटींचे ते पॅकेज होते.

सरकार मिशन इलेक्शन मुडमध्ये ....जलसंपदा विभागाला २१ हजार ५८० कोटी २४ लाख रुपये, तर सार्वजनिक बांधकामाला १२ हजार ९३८ कोटी ८५ लाख रुपयांची घोषणा मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. ४५ पैकी ३४ हजार ५१८ कोटी या दोन विभागांसाठीच दिले. उर्वरित १० हजार ४८२ पैकी ७ हजार ८६ कोटी जिल्हानिहाय विविध योजनांसाठी घोषित केले. ३३९६ कोटी इतर कामांसाठी आहेत. राज्य सरकार सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे.

जिल्हानिहाय केलेल्या घोषणा अशाछत्रपती संभाजीनगर : दोन हजार कोटीधाराशिव : १ हजार ७१९ कोटीबीड : १ हजार १३३ कोटीलातूर : २९१ कोटीहिंगोली : ४२१ कोटीपरभणी : ७०३ कोटीजालना : १५९ कोटीनांदेड : ६६० कोटीएकूण : ७ हजार ८६ कोटी

सूत्रांची माहिती अशी...शुक्रवारी सर्व विभागांशी प्राथमिक चर्चा केली. सिंचनासाठी केलेल्या स्वतंत्र १४ हजार कोटींच्या घोषणा अंमलबजावणीचा आढावा घेतला. यातील बहुतांश कामे सुरू झाली आहेत. इतर विभागासाठी केलेल्या घोषणा, सद्य:स्थितीचा अहवाल तयार होण्यास उशीर लागेल. इमारती, क्रीडांगणांच्या घोषणा झाल्या, परंतु अद्याप जागा मिळालेली नाही. सचिव पातळीवर विभागप्रमुखांनी काही थेट प्रस्ताव दिले आहेत का? याची माहिती मागविली आहे.- वरिष्ठ सूत्र, विभागीय प्रशासन

टॅग्स :MarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेWaterपाणी