लातूर : बारावी परीक्षेस सामोरे गेलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास १०७ विद्यार्थ्यांच्या काही तांत्रिक गडबडीमुळे निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनात आजही धडकी आहे. लातूर विभागीय मंडळातर्गंत झालेल्या परीक्षेत २२ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे आढूळ आले होते. त्यांच्या परीक्षेची संपादणूक रद्द करीत पुढील एक परीक्षेसाठी या विद्यार्थ्यांना अपात्र केले आहे, तर गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या एक-दोन विद्यार्थ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या काही छोट्या-मोठ्या तांत्रिक गडबडीची दखल घेत मंडळाने १०७ विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवला आहे. राज्य मंडळाने घेतलेल्या निर्णयानंतरच या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे. लातूर विभागात घेण्यात आलेल्या १८९ पराक्षा केंद्रांवर २ हजार ७५० पर्यवेक्षकांनी कामगिरी बजावली. तर या सर्व परीक्षा केंद्रांवर मंडळाने बैठे पथकाची व्यवस्थाही केली होती. याशिवाय विविध विभागाच्या भरारी पथकांकडूनही परीक्षा केंद्रांवर करडी नजर ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आली होती. त्यामुळे सकारात्मक परिणाम झाला. परिणामी, परीक्षेतील गैरप्रकाराला चांगलाच आळा बसला. (प्रतिनिधी) विभागात लातूर... लातूर विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९१.६३ टक्के लागला असून, तर नांदेड जिल्ह्याचा ९०.४१ टक्के निकाल लागला असून, उस्मानाबाद जिल्ह्याचा ८८.७५ टक्के निकाल आहे.
१०७ विद्यार्थ्यांच्या मनात धडकी !
By admin | Updated: June 3, 2014 00:45 IST