शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देशभरात नवी १०० नर्सिंग महाविद्यालये सुरू करणार: जे. पी. नड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 15:30 IST

महाराष्ट्रास १० नवी वैद्यकीय महाविद्यालये देण्यात आली असून, त्यात आणखी एकाची भर पडत आहे.

छत्रपती संभाजीनगर : सरकारने कॅन्सरच्या उपचाराला प्राधान्यक्रम दिले आहे. वैद्यकीय शिक्षण असो की आरोग्य सेवा, निधीची कमतरता राहणार नाही. देशात १०० वैद्यकीय महाविद्यालयांसोबत नवे १०० नर्सिंग काॅलेज सुरू केले जातील. यात गोंदियात १९५ कोटी रुपयांच्या निधीतून आणि नंदूरबारमध्ये ३२५ कोटींतून हे काॅलेज स्थापित केले जातील. महाराष्ट्रास १० नवी वैद्यकीय महाविद्यालये देण्यात आली असून, त्यात आणखी एकाची भर पडत आहे. एमबीबीएसच्या ७०० जागा वाढल्या आहेत. नागपूर, मुंबईसह सहा ठिकाणी नवीन काॅलेजही दिले, असे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा म्हणाले.

शासकीय कर्करोग रुग्णालयातील (राज्य कर्करोग संस्था) ट्रू बीम युनिटचे आणि कर्करोग रुग्णालयाच्या विस्तारित भागाचे रविवारी लोकार्पण नड्डा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. याप्रसंगी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय केणेकर, आ. अनुराधा चव्हाण, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, राज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ. कैलास शर्मा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांची उपस्थिती होती.

जे. पी. नड्डा म्हणाले, हे सरकार कॅन्सरच्या प्रतिबंधावर, स्क्रिनिंगवर व वार्धक्यशास्त्रावरही भर देत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आगामी तीन वर्षांत ‘डे केअर सेंटर’ सुरू करण्याचे लक्ष्य आहे. यावर्षी २०० ‘डे केअर सेंटर’ सुरू करीत असून, त्यात महाराष्ट्रालाही प्राधान्यक्रम असेल. रुग्णालयाला दिलेल्या योगदानाबद्दल डाॅ. कैलाश शर्मा, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. अजय बोराळकर, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. अर्चना राठोड यांचा सत्कार करण्यात आला. डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी आभार मानले.

१०० खाटांवरून ३०० खाटांपर्यंत विस्तारमहाराष्ट्र शासनाचे पहिले आणि केवळ कर्करोग रुग्णांसाठी समर्पित शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयासाठी रविवारचा दिवस सोनेरी ठरला. कर्करोग रुग्णांसाठी २०१२ मध्ये १०० खाटांवर सुरू झालेल्या कर्करोग रुग्णालयाचा आता ३०० खाटांपर्यंत विस्तार झाला आहे.

स्वतंत्र जिल्हा रुग्णालये, आरोग्य सेवेचे नवीन मॉडेल करणार : मुख्यमंत्रीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सरकारी व्यवस्थेत पहिल्यांदा ट्रू बीमची व्यवस्था छत्रपती संभाजीनगरमध्ये झाली आहे. राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली असून, त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पाच हजार कोटींचे कर्ज उभे केले आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय हे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रूपांतरित झाले आहेत, अशा जिल्ह्यात स्वतंत्र सामान्य रुग्णालय उभारू. पुढील तीन ते चार वर्षांत प्रत्येकाला गुणात्मक आरोग्य सेवा त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटर परिसरात उपलब्ध करू.

‘एम्स’च्या मागणीकडे दुर्लक्षवैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी नड्डा यांच्याकडे पुण्यासाठी नवीन ‘एम्स’ आणि छत्रपती संभाजीनगरला ‘एम्स’चा दर्जा देण्याची मागणी केली. परंतु, या मागणीकडे नड्डा यांनी दुर्लक्ष केले. देशात पूर्वी ६ एम्स होते. ही संख्या आता २२ झाल्याचे नड्डा म्हणाले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJ P Naddaजगत प्रकाश नड्डा