शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
2
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
3
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
4
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
5
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
6
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
7
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
8
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
9
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
10
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
11
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
12
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
13
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
14
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
15
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
16
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
17
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
18
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
19
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
20
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे

गौरवास्पद! विद्यापीठातील दोन हजार पीएचडी संशोधकांना मिळते वार्षिक १०० कोटी शिष्यवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 12:13 IST

विद्यापीठात शिष्यवृत्तीधारकांची संख्या आणि रक्कम पाहता त्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासते आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संलग्न संशोधन केंद्रांमध्ये संशोधन (पीएच.डी.) करणाऱ्या तब्बल २ हजार १६ विद्यार्थ्यांना वार्षिक १०४ कोटी रुपयांची संशोधन शिष्यवृत्ती मिळते, अशी माहिती समोर आली आहे. विद्यापीठाने ‘पेट’ची प्रक्रिया सुरू केली असून, ही संख्या वाढणार असल्याचा अंदाज वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठ आणि संलग्न १७८ संशोधन केंद्रांमध्ये १ हजार ७६७ मार्गदर्शकांच्या नेतृत्वात तब्बल ३ हजार ९८२ विद्यार्थी पीएच.डी. करीत आहेत. त्यातील काही पूर्णवेळ तर काही अर्धवेळ संशोधन करतात. त्यांपैकी २ हजार १६ विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडून ३३ ते ४५ हजार रुपयांदरम्यान शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. या शिष्यवृत्तीचा वार्षिक आकडा १०४ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशासाठी चाचणी परीक्षा (पेट) घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी नेट जेआरएफ, शिष्यवृत्ती मिळालेल्या एम. फिल.धारकांनाही महिनाभरात पीएच.डी.साठी नोंदणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीधारक संशाेधकांचा आकडा वाढणार आहे.

‘नॅक‘च्या मूल्यांकनात होणार फायदायेत्या काही दिवसांत विद्यापीठाचे ‘नॅक’कडून मूल्यांकन होणार आहे. या मूल्यांकनामध्ये संशोधन हा महत्त्वाचा भाग असतो. विद्यापीठात प्राध्यापकांची संख्या कमी असल्यामुळे संशोधक व संशोधन कमी आहे. या विद्यार्थ्यांच्या संशोधनामुळे नॅक मूल्यांकनात हातभार लागेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

बेरोजगारांना शिष्यवृत्तीचा दिलासासंशोधनासाठी शिष्यवृत्ती मिळालेल्या युवकांमध्ये बहुतांश प्राध्यापकांसाठी आवश्यक अर्हता सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. प्राध्यापकांच्या जागा भरल्या जात नसल्यामुळे संशाेधकांना शिष्यवृत्तीचाच दिलासा आहे.

स्वतंत्र शिष्यवृत्ती विभागाची गरजविद्यापीठात पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी पदव्युत्तर विभागांतर्गतच व्यवस्था केलेली आहे. मात्र, शिष्यवृत्तीधारकांची संख्या आणि रक्कम पाहता त्यासाठी स्वतंत्र विभागाची गरज भासते आहे. त्यातून संशोधकांना सुरळीतपणे सेवा मिळू शकते, असे संशोधक विद्यार्थ्याने सांगितले.

शिष्यवृत्तीधारक पीएच.डी. संशोधक संस्था......................................विद्यार्थी संख्याबार्टी.........................................६८१सारथी........................................४४८महाज्योती...................................१७३राजीव गांधी शिष्यवृत्ती...................२९७नेट जेआरएफ................................१४४राष्ट्रीय शिष्यवृत्ती एससी प्रवर्ग ............२८दिव्यांग शिष्यवृत्ती ..............................१८कोठारी शिष्यवृत्ती ..............................०२राष्ट्रीय शिष्यवृत्ती एसटी प्रवर्ग ............ ५२ आयसीएसएसआर .............................४०माैलाना आझाद अल्पसंख्याक .............१२६सिंगल गर्ल चाइल्ड................................०४एकूण ................................. २०१६

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद