उमरगा : एका युवतीवर जबरी बलात्कार केल्याप्रकरणी एका युवकास १० वर्षे सक्तमजुरी तर त्यास सहाय्य करणार्या महिलेसह युवकास तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश स़ल़पठाण यांनी शुक्रवारी सुनावली़ ही घटना १६ एप्रिल २०१२ रोजी फणेपूर (ता़लोहारा) येथे घडली होती़ अतिरिक्त शासकीय अभियोक्ता व्ही़एस़आळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फणेपूर येथील एका युवतीस कोमलबाई तानाजी कोनाळे या महिलेने १६ एप्रिल २०१२ रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास शौचास जाण्याच्या बहाण्याने बोलावून घेतलेू़ ती मुलगी व कोमलबाई कोनाळे ही गावानजीकच्या भालचंद्र अंहुरे यांच्या शेतातील उसाच्या शेतात गेल्यानंतर सुनिल अप्पाशा लकडे (वय-२२) याच्यासमोर त्या मुलीस उभा केले़ त्यावेळी इस्माईल शहानूर मुल्ला (वय-२४) हाही तेथे आला होता़ त्यावेळी कोमलबाई हिने मुलीस सुनील लकडे याच्यासोबत उसात जाण्यास सांगितले तेव्हा तिने नकार देत आई-वडिलांना सांगेन असे म्हणाली़ त्यावेळी सुनील लकडे याने तिच्या हाताला धरून उसाच्या शेतात ओढत नेले़ ती ओरडत असताना कोमलबाई व इस्माईल याने तिला जिवे मारण्याची धमकी दिली़ तर सुनील याने तिच्यावर बलात्कार केला़ यावेळी तिघांनी ही घटना कोणास सांगितली तर तिच्यासह आई-वडिलांना जिवे मारू, अशी धमकी दिली़ यानंतर चार महिन्याने त्या मुलीस तिच्या आईने सास्तूर येथील स्पर्श रूग्णालयात दाखल केल्यानंतर ती गरोदर असल्याचे समोर आले़ याबाबत पीडित मुलीने १ आॅगस्ट २००८ रोजी लोहारा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघाविरूध्द लोहारा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ त्यानंतर त्या मुलीस तिच्या आई-वडिलांनी बालकाश्रमात पाठविल्यानंतर तिने मुलीस जन्म दिला़ या प्रकरणाचा तत्कालीन पोलिस उपाधीक्षक पंजाबराव भगत यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ या प्रकरणी सुनवाईदरम्यान पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकार्यांची साक्ष, समोर आलेले पुरावे व अॅड़व्ही़एस़आळंगे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश स़ल़पठाण यांनी आरोपी सुनिल लकडे यास भादंवि कलम ३७६, ५०६ अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी व २२ हजाराचा दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी, तर आरोपी इस्माईल मुल्ला व आरोपी कमलबाई कोनाळे यांना बलात्कारप्रकरणी मदत केल्याबद्दल, पीडित मुलीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल भादंवि कलम ५०६, १०९ सह ३७६ अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी पाच हजाराचा दंड, दंड न भरल्यास दोघांना चार महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली़ तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीस देण्याचे आदेश दिले़ (वार्ताहर)
बलात्कार प्रकरणी १० वर्षाची सक्त मजुरी
By admin | Updated: May 31, 2014 00:33 IST