शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कागदावर १ लाख, हातात ३० हजार

By admin | Updated: July 18, 2014 01:46 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड घरातील कर्ता-सवरता गेल्यावर मागे कुटुंबाचे काय होते हे ज्याच्यावर वेळ आली आहे त्यांना विचारा.

व्यंकटेश वैष्णव , बीडघरातील कर्ता-सवरता गेल्यावर मागे कुटुंबाचे काय होते हे ज्याच्यावर वेळ आली आहे त्यांना विचारा. आभाळच फाटल्यावर शिवायचं कुठं असा प्रश्न पाटोदा तालुक्यातील घुमरा पारगाव येथील आत्महत्या केलेल्या सुग्रीव शिंदे या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पडला आहे. शासन म्हणायला एक लाखाची मदत देते, परंतु कुटुंबाच्या हातात केवळ तीस हजार रूपये येतात.घुमरा पारगाव येथील सुग्रीव भागवत शिंदे (वय ४५) या शेतकऱ्यांने २ फेबु्रवारी २०१४ रोजी विष प्राशन करून आयुष्य संपवले. आता सुग्रीव यांची पत्नी वनमाला परिस्थितीशी झगडत आहे. घरी दहा एकर जमीन असताना देखील ती रोजंदारीने मजुरी करून आपल्या मुलांचे शिक्षण व घर चालवते आहे.कर्जबाजारीपणामुळे पती व घराचा कर्ता करविता गेल्याचे दुख: हृदयात साठवून मोठ्या हिमतीने त्या लढत आहेत.याबाबत सांगताना वनमाला शिंदे यांचे डोळे भरून येतात. वनमाला या मोठ्या धीराने परिस्थितीशी दोन हात करत आहेत. यावेळी त्या ‘लोकमत’शी बोलताना म्हणाल्या की, पतीच्या निधनानंतर मिळालेल्या सरकारी मदतीपेक्षा मी मुलांना हिमतीने आणि कष्टाने जगायचे शिकवतेय़ आज माझं कुटुंब अडचणीत असताना मुदत ठेवीच्या पैशाचा काय उपयोग असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.शासन मोठा गाजावाजा करीत १ लाखाची मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला दिली असल्याचे सांगते. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या हातात केवळ ३० हजार रूपयाचा धनादेश टेकवते व उर्वरित ७० हजार रूपये त्या तालुक्यातील तहसीलदार व संबंधित शेतकऱ्याच्या पत्नीच्या संयुक्त खात्यावर फिक्स डिपॉझिट केले जातात़शासनाने धनादेश स्वरूपात दिलेल्या ३० हजार रूपयांत साधी दहा एकर जमिनीची नांगरणी होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती वातानुकूलित रूममध्ये बसलेल्या नेत्यांना व अधिकाऱ्यांना का कळत नाही कोणास ठाऊक ?दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीमागील पाच वर्षापासून सतत अल्प पाऊस पडत असल्याने जमिनीची नापिकी यामुळे संसाराचा गाडा हाकणे देखील आवघड झालेले असताना देखील त्यांच्यावर दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. मुलगा श्रीरंग याने आयटीआय केलेला मात्र नोकरी नाही. तर दुसरा मुलगा आश्लेष दहावीत शिकत आहे.