जि.प. शिक्षकाच्या सुरेल गाण्यांची रसिकांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:28 IST2021-09-03T04:28:03+5:302021-09-03T04:28:03+5:30

सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येत युजर्स वेदांत मेहरकुळे गोंडपिपरी : पेशाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने गीतांना ...

Z.P. The teacher's melodious songs captivated the audience | जि.प. शिक्षकाच्या सुरेल गाण्यांची रसिकांना भुरळ

जि.प. शिक्षकाच्या सुरेल गाण्यांची रसिकांना भुरळ

सोशल मीडियावर हजारोंच्या संख्येत युजर्स

वेदांत मेहरकुळे

गोंडपिपरी : पेशाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने गीतांना संगीतबद्ध करीत अल्बमच्या रुपात रसिकांच्या भेटीला आणला आहे. या अल्बममधील अनेक गीते आता रसिकांना भुरळ घालत आहे.

विशेष म्हणजे कोरोनात आई, वडील गमावलेल्या बालकांच्या वेदना त्यांनी गीतातून स्वरबद्ध केल्या आहे. नुकतेच या अल्बमचे लोकार्पण झाले आणि अल्पावधीतच ते रसिकांच्या मनावर अधिराज्य करीत आहे. मुरलीधर सरकार असे या ध्येयवेड्या शिक्षकाचे नाव आहे. कोरोना काळात सर्वत्र टाळेबंदी होती. नागरिकांच्या मनात कोरोनाची दहशत होती. अनेक रोजगार बुडाले, व्यवसाय ठप्प पडले. हीच परिस्थिती कलावंतांवरही आली. अनेक कलावंतांच्या हाताला काम नव्हते. त्यामुळे या कलावंतांच्या हाताला काम देण्यासह त्यांच्या कलागुणांना डिजिटल मंच मिळवून देण्यासाठी ‘प्रेमाचे गुंतले धागे’ हा अल्बम तयार केला. लोकार्पण होताच एका दिवशी ११ हजार रसिकांनी तो बघितला. विशेष म्हणजे हा व्हिडिओ अल्बम असून यातील कलावंत, संगीतकार, निर्माता सर्वच स्थानिक आहेत. चंद्रपूर, जुनोना, लोहारा आणि परिसरातच चित्रीकरण करण्यात आले. ‘कुठे शोधू मायबापाला’ हे गीत कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या अनाथ मुलांच्या वेदना मांडणारे आहे तर ‘माझी रिंगटोन,प्रेम करतो मामाच्या पोरीवर’ आदी गीत अस्सल मनोरंजन करणारे आहेत. रसिकांनी डिजिटल मीडियावर बघावं आणि मनसोक्त आनंद घ्यावा, असा हा व्हिडिओ अल्बम आहे.

020921\img-20210901-wa0005.jpg

गायक जिल्हा परिषद शिक्षक मुरलीधर सरकार यांचा फोटो

Web Title: Z.P. The teacher's melodious songs captivated the audience