जि.प. स्वच्छ भारत मिशनच्या कामात अग्रेसर
By Admin | Updated: March 16, 2017 00:42 IST2017-03-16T00:42:31+5:302017-03-16T00:42:31+5:30
जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनतंर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामे व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करणेच्या कामामध्ये गेल्या तीन वर्षापासुन सतत अग्रक्रमावर राहली असुन , ...

जि.प. स्वच्छ भारत मिशनच्या कामात अग्रेसर
पाच तालुके हागणदारीमुक्त : वर्षभरात ५६ हजार शौचालयांचे बांधकाम
चंद्रपूर : जिल्हा परिषद स्वच्छ भारत मिशनतंर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामे व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करणेच्या कामामध्ये गेल्या तीन वर्षापासुन सतत अग्रक्रमावर राहली असुन , जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशनच्या कामाला जिल्ह्यात अधिक गती निर्माण झाली आहे. सन २०१६-१७ या वषार्साठी शासनाने दिलेले माहे जानेवारी २०१७ मधील उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यास जिल्हा परिषद यशस्वी ठरली आहे. तर पाच तालुके हागणदारी मुक्त झाली आहेत.
वैयक्तिक शौचालय बांधकामामध्ये जि.प.ने आपले उदिष्ट पूर्ण करुन ५६ हजार १९ शौचालयाचे बांधकाम या वर्षात केली. त्यानुसार १६३ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहेत. तसेच मार्च २०१७ अखेर पर्यंत ६० हजार शौचालयाचे बांधकाम करण्यात येणार असुन, जिल्हा हागणदारी मुक्त करण्याकरिता जिल्हापरिषद प्रयत्नशील आहे.
सन २०१६-१७ वर्षात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ३३ हजार ७५२ वैयक्तिक शौचालयाचे व मुल, ब्रम्हपुरी दोन तालुके हागणदारी मुक्त करण्याचे उद्दीष्ट होते. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.डी.सिह यांनी स्वच्छ भारत मिशनच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले. त्यामुळेच या वर्षात मुल, ब्रम्हपुरी, पोभुर्णा, नागभिड, सिंदेवाही ही पाच तालुके हागणदारी मुक्त करण्यात आले आहेत .
मागील वर्षात बल्लारपुर तालुका हागणदारी मुक्त करुन, विदभार्तील पहिला हागणदारीमुक्त तालुका म्हणुन जिल्हा परिषदला मान मिळाला.हिच प्रेरणा घेवून या वर्षात मुल, ब्रम्हपुरी, पोभुर्णा, नागभिड, सिंदेवाही अशी पाच तालुके हागणदारी मुक्त करण्यासाठी येथील गडविकास अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे पाच तालुके हागणदारीमुक्त करणारी विदभार्तील एकमेव चंद्रपूर जिल्हा परिषद ठरली आहे.
चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधिर मुनगंटीवार यांनी २ आक्टोंबर २०१७ रोजी जिल्हा हागणदारी मुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शौचालय बांधकामाची कामे वेगाने चालु आहे. सन २०१४-१५ ते सन २०१६-१७ या तीन वर्षात एक लाख तीन हजार ८५० वैयक्तिक शौचालयाची कामे पूर्ण झाली असुन, चालु वर्षात ५९ हजार १९ वैयक्तिक शौचालयाचा लाभ देण्यास जिल्हा परिषद यशस्वी झाली आहे. ८२७ ग्रामपंचायतीपैकी ५५१ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त म्हणुन घोषित करण्यात आल्या असुन, चंद्रपुर जिल्हा परिषद ग्रामपंचायती हागणदारी मुक्त करण्याच्या कामात राज्यात सातव्या क्रंमाकावर आहे. तर वैयक्तिक शौचालय बांधकामात राज्यात आठव्या क्रंमाकावर आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविन्द्र मोहिते, स्वच्छ भारत मिशनची पुर्ण चमु, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी, तालुका पातळीवरुन नेमण्यात आलेले संपर्क अधिकारी, गटासमन्वयक,समुह समन्वयक यांच्या अंतर्गत गावस्तरावर जावून कामाची पाहणी व मार्गदर्शन, गृहभेटी देवुन स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे, कलापथकाच्या माध्यमातून जनजागरणाद्वारे शौचालय बांधकाम व वापर करण्याविषयी प्रेरित करीत आहेत. महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड व साखरवाही या गावाला भेट देऊन स्वच्छ भारत मिशनतंर्गत कामाचे कौतूक केले. (नगर प्रतिनिधी)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ पर्यंत स्वच्छ भारत देशाचे स्वप्न असुन, यास खरे उतरविण्यासाठी चंद्रपुर जिल्हा परिषद सतत प्रयत्नशिल आहे. गावा-गावात स्वच्छ्तेची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम सतत राबविल्या जात आहे. तसेच जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे.
-एम.डी.सिह, मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.चंद्रपुर.