जि.प. सुरू करणार सेमीइंग्लिश शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:32 IST2018-12-01T22:31:18+5:302018-12-01T22:32:50+5:30

जि. प. शाळांमधील कमी होणारी पटसंख्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी कॉन्व्हेंट शाळांकडे वाढणारा कल पाहून जिल्हा परिषदेने मागेल त्याला सेमी इंग्लिश शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीने पुढील सत्राकरिता ठराव पाठविल्यास जि. प. कडून मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे.

Zip Seminational school to start | जि.प. सुरू करणार सेमीइंग्लिश शाळा

जि.प. सुरू करणार सेमीइंग्लिश शाळा

ठळक मुद्देग्रामीण विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी : शाळा समितीने सादर करावा ठराव

राजेश मडावी।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जि. प. शाळांमधील कमी होणारी पटसंख्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा इंग्रजी कॉन्व्हेंट शाळांकडे वाढणारा कल पाहून जिल्हा परिषदेने मागेल त्याला सेमी इंग्लिश शाळा सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीने पुढील सत्राकरिता ठराव पाठविल्यास जि. प. कडून मंजुरी प्रदान करण्यात येणार आहे.
मागील दहा वर्षांपासून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षण देणाऱ्या कॉन्व्हेंटची संख्या वाढली. या शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता हा वेगळा विषय असला तरी अलिकडे बहुतेक पालकांचा ओढा आपल्या पाल्यांना इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये दाखल करण्याकडे वाढला आहे. शासनाकडून या शाळांना कोणतेही अनुदान मिळत नसल्याने संस्था चालकांनी पालकांकडून मनमानी शुल्क वसुली सुरू केली आहे. दर्जेदार शिक्षणाच्या नावाखाली वेगवेगळे शुल्क आकारून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही आता इंग्रजी कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या वाढली. याचा सर्वात मोठा फटका जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना बसला. यावर पर्याय काढला नाही तर तुकड्या कमी करण्याची वेळ येईल, हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा केली. पुढील सत्रात ज्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती सेमी इंग्लिश सुरू करण्यासाठी ठराव पाठवेल त्याला मंजुरी देण्याचा निर्णय शिक्षण व क्रीडा समितीने घेतला. जि. प. शिक्षण सभापती क्रिष्णा सहारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दिपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर, सदस्य पृथ्वीराज अवथडे, गोपाल दडमल, डी. आय. इ. सी. पी. डी. प्राचार्य धनंजय चाफले, रंजित सोयाम, नितु चौधरी, योगिता डबले, मेघा नलगे, कल्पना पेचे, तज्ज्ञ सदस्य जी. डी. पोटे आदींनी सेमी इंग्रजी वर्गाची उपयोगिता लक्षात घेऊन हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
शिथिल झालेल्या नियमाचा आधार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सेमी इंग्लिश वर्ग सुरू करायचा असेल तर संबंधित शाळेतील शिक्षक इंग्रजी माध्यमातून डि.एड. किंवा पदवीचे शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक होते. राज्य शासनाने या नियमांमध्ये शिथिलता आणली. यामुळे जिल्हा परिषदेने पुढील सत्रापासून मागेल त्या शाळेला सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यास मान्यता देणार आहे.

Web Title: Zip Seminational school to start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.