जि.प. अध्यक्ष २५ सप्टेंबरला स्वीकारणार पदभार

By Admin | Updated: September 22, 2014 23:16 IST2014-09-22T23:16:36+5:302014-09-22T23:16:36+5:30

रविवारी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या संध्या गुरुनुले यांची अध्यक्षपदी तर, कल्पना बोरकर यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.

Zip The chairman will take charge on September 25 | जि.प. अध्यक्ष २५ सप्टेंबरला स्वीकारणार पदभार

जि.प. अध्यक्ष २५ सप्टेंबरला स्वीकारणार पदभार

चंद्रपूर : रविवारी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या संध्या गुरुनुले यांची अध्यक्षपदी तर, कल्पना बोरकर यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. निवड झालेले पदाधिकारी २५ सप्टेंबर रोजी आपला पदभार स्वीकारणार आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे होते. त्यांच्याकडून संध्या गुरुनुले तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेले तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्याकडून कल्पना बोरकर पदभार स्वीकारणार आहे. दोघांनीही २५ सप्टेंबर ही तारीख ठरविली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने तयारीही सुरु केली आहे.
अध्यक्षांनी टेबलची दिशा बदलविली
जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी अध्यक्षांच्या कक्षातील टेबल-खुर्चीची दिशा बदलविली आहे. याबाबत त्यांचे काय समिकरण आहे, हे मात्र समजू शकले नाही.(नगर प्रतिनिधी)

Web Title: Zip The chairman will take charge on September 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.