जिल्हा परिषदेत हमरीतुमरी

By Admin | Updated: January 20, 2015 23:09 IST2015-01-20T23:09:44+5:302015-01-20T23:09:44+5:30

जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला, शाळा समिती आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद संपविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी

In the Zilla Parishad, we welcome you | जिल्हा परिषदेत हमरीतुमरी

जिल्हा परिषदेत हमरीतुमरी

युनियन पदाधिकाऱ्यांत जुंपली : मुख्याध्यापक-शालेय पोषण समिती
चंद्रपूर : जिल्ह्यातील काही शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला, शाळा समिती आणि मुख्याध्यापकांमध्ये वाद सुरु आहे. हा वाद संपविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. मात्र या सुनावणीमध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि मुख्याध्यापकांमध्ये चांगलीच जुंपल्याने मोठे वांदग निर्माण झाले. काही महिला शिक्षक, आहार शिजविणाऱ्या महिला तथा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नारेबाजी केली. या प्रकारामुळे जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान सुनावनी रद्द करण्यात आली. यानंतर मुख्याध्यपकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर पोषण आहार कर्मचारी युनियनने पोलीस ठाणे गाठले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: In the Zilla Parishad, we welcome you