जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश धडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST2021-07-17T04:22:58+5:302021-07-17T04:22:58+5:30

सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून आता ...

Zilla Parishad staff transfer order struck | जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश धडकला

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश धडकला

सामान्य प्रशासन विभागाच्या १ जुलैच्या शासन निर्णयानुसार १४ ऑगस्टपर्यंत बदल्या करण्याचे निर्देश जारी केले होते. याच आदेशाला अनुसरून आता १४ जुलै २०२१ रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदला पत्र पाठवून कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले. जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदल्या शासन निर्णय १५ मे २०१४ मधील तरतुदीनुसार केली जाते, अशी माहिती सूत्राने दिली. या बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण केल्यानंतर १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत समुपदेशनाची प्रक्रिया सुरू होईल.

कोरोनामुळे हैदोस घातल्याने राज्याच्या महसुली उत्पन्नावर वाईट परिणाम झाला. अशा संकटाच्या काळात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे परवडणारे नाही, अशी सूचना वित्त विभागाने केली. त्यामुळे हा विषय मागे पडला. दरम्यान, राज्यभरातील कर्मचारी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावा केल्याने राज्य सरकारने जि. प. कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला हिरवी झेंडी दाखविली. सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाचे पत्र धडकल्याने ही प्रक्रिया केव्हा सुरू होणार, याकडे इच्छुक व पात्र कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

बॉक्स

शिक्षकांच्या बदल्यांचा पेच

सामान्य प्रशासन व ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या पत्रात जि. प. शिक्षकांच्या बदल्यांबाबत कोणताही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात आहेत. स्वतंत्र आदेश काढला जाण्याची शक्यता आहे. ग्रामविकास विभागाने १५ मे २०१४ च्या शासन निर्णयात २० टक्के बदल्या तर ९ जुलैच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयात १५ टक्के असा उल्लेख आहे. परिणामी, शिक्षकांचा अपवाद वगळता अन्य बदल्यांना मंजुरी मिळाली प. नेमक्या किती टक्के बदल्या होणार, याबाबत सध्या तरी अनिश्चितता आहे.

Web Title: Zilla Parishad staff transfer order struck