जिल्हा परिषद शाळेची ‘स्मार्ट’ शाळेकडे वाटचाल

By Admin | Updated: September 7, 2016 00:54 IST2016-09-07T00:54:36+5:302016-09-07T00:54:36+5:30

अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या केवळ नावापुरत्याच राहिल्या असा अनेकांचा गैरसमज दूर करणाऱ्याही काही शाळा आहेत.

Zilla Parishad School will move towards 'smart' school | जिल्हा परिषद शाळेची ‘स्मार्ट’ शाळेकडे वाटचाल

जिल्हा परिषद शाळेची ‘स्मार्ट’ शाळेकडे वाटचाल

इतर शाळांपुढे आदर्श : अतिदुर्गम भागातील कुंबेझरी शाळेची यशोगाधा
संघरक्षीत तावाडे जिवती
अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा या केवळ नावापुरत्याच राहिल्या असा अनेकांचा गैरसमज दूर करणाऱ्याही काही शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा असल्या तरी त्यांनी आयएसओ प्रमाणपत्रासारखे गौरव प्राप्त झाले आहेत. अशीच एक शाया जिवती तालुक्यातील कुंबेझरी येथील जिल्हा परिषद शाळा आहे. जे चांगल्या भागातील शाळेत नाही ते सर्व या शाळेत पाहायला मिळते.
जिवतीवरुन आठ किमी अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद कुंबेझरी शाळेची यशोगाथा तालुक्यात कौतुकास्पद ठरत आहे. एवढ्या दुर्गम भागात ही शाळा असून आज या शाळेची स्मार्ट शाळेसाठी वाटचाल चालू आहे. यासाठी येथील शिक्षकांचीही मेहनत तेवढीच महत्त्वाची आहे हे या शाळेतील शिक्षकांनी दाखवून दिले आहे. कृतीशील शिक्षक असला की त्यांना सांगण्याची गरज नाही अशी कौतुकास्पद शाळा तयार होते हे यावरुन दिसते.
जि.प. शाळा कुंबेझरीला भेट दिली तर या शाळेत अनेक गोष्टी या नाविण्यपूर्ण दिसतील. सोईसुविधा उपक्रम या बाबतीत ही शाळा अजिबात मागे नाही चार फुटाच्या आरओ + युव्हीयुक्त थंड पाण्याचे वाटर फिल्टरपासून तर विद्यार्थ्यांसाठी लागणारे सर्व शालेय साहित्य मिळणारे जनरल स्टोअर्ससुद्धा या शाळेत आहे. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम औषधीबाग तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण वैज्ञानिक युगात वावरत आहोत, याचा परिचय देते. गांढूळ खत प्रकल्प हात धुन्यासाठी बेसिन, परसबाग, कचरा कुंड्या, झाशी राणीबाग, सावित्रीबाई फुले फुलबाग, ज्ञानतारा वाचनालय अशा अनेक सोयीसुविधा आपणास दिसतील.
काही जि.प. शाळा बंदच्या मार्गावर असल्या तरी कुंबेझरी सारख्या दुर्गम भागातील शाळेत आजच्या घडीला २०५ विद्यार्थी शिकत आहेत. तेथील शिक्षकांची एवढी मेहनत आहे की, त्या शाळेला त्यांनी विविधतेनी नटवले आहे.
यासाठी गावकऱ्यांचा सहभाग मिळाला असेही शिक्षक सांगतात आणि म्हणूनच येथील मुख्याध्यापक गाऊले यांना सत्र २००५ मध्ये शासनाचा जि.प. चंद्रपूर कडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. जिवती तालुका दुर्गम भागात असून या तालुक्याकडे इतरांचा दृष्टिकोन सावत्रपणाचा आहे. या तालुक्यातील शाळा म्हणजे नावापुरत्याच असा समज आहे. येथील विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाही किंवा येथील शिक्षक शाळा बरोबर करीत नाही, विद्यार्थी किंवा शाळेकडे लक्ष देत नाही पण कुंबेझरी येथील शाळा आणि शिक्षकांची कृती पाहून जिवती तालुक्यातील प्रत्येक शाळा अशी बनली तर इतरांचा गैरसमज दूर होईल यात शंका नाही.

शाळेत असणाऱ्या सुविधा
संगणक कक्ष, विद्यार्थी बचत बँक, स्वतंत्र मूत्रिघर, शौचालय, मध्यान भोजनासाठी सुसज्ज शेड, किचन शेड, सावित्रीबाई फुले सांस्कृतिक मंच, ध्वनी प्रक्षेपक संच दूरदर्शन संच, रेडिओ, दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था, डायनिंग चेअरची व्यवस्था, बैठक व्यवस्थेचे डेक्स बेंच, खेळ साहित्य, शैक्षणिक साहित्य.
शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम
सप्तरंगी परिपाठ, अभ्यास गट, शालेय मंत्रिमंडळ, मिना-राजू मंच, दप्तर विरहीत शाळा (एकदिवस), थोर व्यक्तींच्या जयंत्या-पुण्यतिथ्या, माझी शाळा माझे दुकान, माझी रोजनिशी, माझी स्वच्छ शाळा, वृक्षारोपण संवर्धन, विद्यार्थी ड्रेस कोड, तंबाखु मुक्त शाळा, स्वलेखन करणे, पालक सभा, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, बाल आनंद मेळावा, शैक्षणिक सहल, खरी कमाई, औषधी वनस्पती लागवड, कचऱ्यापासून गांढूळ खत प्रकल्प.

Web Title: Zilla Parishad School will move towards 'smart' school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.