शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे राजकारण बदलणार; 6 जागा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

चंद्रपूर जि.प. मध्ये ६ आणि पंचायत समित्यांमध्ये १२ जागांची वाढ झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश दिला. या प्रक्रियेला विलंब लागणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांच्या नजरा निवडणूक तारखेकडे लागल्या आहेत. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाअभावी निवडणुका घेणे टाळले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत अधिनियम १९६१ मधील कलम ९ अंतर्गत राज्य सरकारने दुरुस्ती करून जि.प. तसेच पंचायत समितीच्या जागा वाढविल्या. चंद्रपूर जि.प. मध्ये ६ आणि पंचायत समित्यांमध्ये १२ जागांची वाढ झाली. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करण्याचा आदेश दिला. या प्रक्रियेला विलंब लागणार आहे. मात्र, इच्छुक उमेदवारांच्या नजरा निवडणूक तारखेकडे लागल्या आहेत.राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाअभावी निवडणुका घेणे टाळले. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. सध्या तरी याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, जिल्हा परिषद व महानगरपालिका, नगर परिषद व नगरपंचायतींचा कालावधी संपला. त्यामुळे सध्या प्रशासकराज सुरू आहे. चंद्रपूर जि.प.चा कारभारही प्रशासकच हाकत आहेत. यापूर्वी ५६ जि.प. सदस्य होते. नव्या दुरुस्तीनुसार ६ जागा वाढून त्या आता ६२ झाल्या आहेत. या वाढीव जागांसाठी विविध राजकीय पक्षांच्या इच्छुकांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत.

सदस्य ५६ वरुन ६२वर

चंद्रपूर जिल्हा परिषदेत यापूर्वी ५६ गट होते. अधिनियम दुरुस्तीमुळे ६ जागांची भर पडून ६२ गट झाले. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक प्रशासनाने गट व गणांची पुनर्रचना केली होती. मान्यता मिळाल्याने राज्य सरकारने अधिसूचना जारी केली.

जिल्हा परिषदेवर प्रशासकराजभाजपने दोन टर्म जिल्हा परिषदेवर राज्य केले. या दोन्ही टर्ममध्ये भाजपचा जणू एकछत्री अंमल होता. मुदत संपल्याने सध्या प्रशासकराज सुरू आहे. आगामी निवडणुकीत भाजपचे पुनरागमन होते की, महाराष्ट्र विकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस जि. मध्ये एन्ट्री करते, हे निवडणुकीनंतरच कळेल.

पंचायत समिती गणांतही जोरदार हालचाली- चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांमध्ये यापूर्वी ११२ गण होते. त्यामध्ये १२ गणांची वाढ झाली. - या वाढीव जागांवर नजर ठेवून सर्वच पक्षांचे इच्छुक कामाला लागल्याचे दिसून येत आहे. 

लोकप्रतिनिधी म्हणतात...

गट-गणांवर आक्षेप व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती व महिला आरक्षण सोडत होईल. त्यावरही हरकती येतील. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया लांबणीवर जाऊ शकते.- संजय गजपुरे, माजी जि. प. सदस्य, नागभीड

जि.प. गट आणि पं.स. गणांची संख्या वाढवल्याने इच्छुकांमध्ये चुरस वाढेल. त्या भागाला प्रतिनिधित्व मिळणार असल्याने तेथील समस्या प्रशासनासमोर येतील. या समस्यांचा निपटारा होईल. सरकारचा निर्णय योग्यच आहे.- नंदु नागरकर, माजी शहर अध्यक्ष कॉंग्रेस, चंद्रपूर

नव्या नेतृत्वाला संधी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम सादर करण्याचा आदेश सरकारला दिला. या प्रक्रियेला विलंब लागेल, अशी शक्यता आहे. वाढीव गट व गणांमुळे नव्या नेतृत्वाला संधी मिळेल. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदpanchayat samitiपंचायत समिती