गुंतवणूक लाखोंची विक्री शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST2020-05-11T05:00:00+5:302020-05-11T05:00:58+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात साधारणत: दोन हजाराच्या आसपास कुलर तयार करणारे व्यावसायिक आहे. यातील काहींची प्रस्तुत प्रतिनिधींनी भेट घेत लॉकडाऊनच्या कालावधीबाबत चर्चा केली. अनेकांनी एमआयडीसी तसेच गोडाऊनमध्ये कुलर तयार केल्याचे दिसून आले. कुलर तयार करण्याचे साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात मिळत नसल्याने बहुतांश जणांनी बाहेरून साहित्याची खरेदी केली. यासाठी काहींनी खासगी तसेच बँकाचे कर्ज उचलले आहे.

Zero sales of investment millions | गुंतवणूक लाखोंची विक्री शून्य

गुंतवणूक लाखोंची विक्री शून्य

ठळक मुद्देकुलर व्यावसायिकांची झोप उडाली : घेतलेले कर्ज फेडणेही झाले कठीण

साईनाथ कुचनकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कुलर विक्रीतून चार पैसे मिळावे, यासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून कुलर तयार केले, मात्र कोरोनाचे संकट आले आणि वर्र्षभराचे नियोजन कोलमडले. गुंतवणूक लाखोेंची असतानाही विक्री शून्य झाल्याने घेतलेले कर्ज, कामगारांचे वेतन तसेच वर्षभराचा खर्च कसा भागवायचा, ही विवंचना त्यांनी लोकमतसमोर मांडली.
चंद्रपूर जिल्ह्यात साधारणत: दोन हजाराच्या आसपास कुलर तयार करणारे व्यावसायिक आहे. यातील काहींची प्रस्तुत प्रतिनिधींनी भेट घेत लॉकडाऊनच्या कालावधीबाबत चर्चा केली. अनेकांनी एमआयडीसी तसेच गोडाऊनमध्ये कुलर तयार केल्याचे दिसून आले. कुलर तयार करण्याचे साहित्य चंद्रपूर जिल्ह्यात मिळत नसल्याने बहुतांश जणांनी बाहेरून साहित्याची खरेदी केली. यासाठी काहींनी खासगी तसेच बँकाचे कर्ज उचलले आहे. मात्र ऐनवेळी लॉकडाऊन झाला. त्यामुळे आर्डर असतानाही कुलर चिल्लर व्यावसायिकांपर्यंत पोहचविताच आले नाही. त्यामुळे गोडाऊन तसेच गोडाऊनच्या बाहेर त्या स्थितीत अनेकांचे कुलर पडून आहे. विशेष म्हणजे, काही व्यावसायिकांनी कुलर तयार करून बाहेर ठेवले आहे. अवकाळी पावसामुळे नवीन कुलरचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या सर्वाचा भार कसा सोसायचा, हा प्रश्न सध्या त्यांना सतावत असून त्यांची सध्यातरी झोप उडाली आहे. उन्हाळ्याच्या दोन ते तीन महिन्यामध्ये कुलर व्यावसायिक आपला व्यवसाय करून वर्षभराचे आर्थिक गणित जुळवितात. यावर्षी मात्र आर्थिक गणित कोलमडल्यामुळे त्यांना अन्य व्यवसाय करावा लागणार आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून कुलर तयार करण्याचे काम सुरु केले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतविला.कुलर तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साहित्यही खरेदी केले आहे.मात्र लॉकडाऊन झाले आणि पूर्णत: नुकसान झाले.
-दादा चहारे, व्यावसायिक, चंद्रपूर

मार्च ते मे या महिन्यामध्येच व्यवसाय असतो. मात्र यावेळीच लॉकडाऊन झाले आणि पूर्णत नुकसान सहन करावे लागत आहे. नोकरांचे पैसे सुद्धा कसे द्यावे, हा प्रश्न पडला आहे.
विनोद बुरीले, व्यावसायिक, चंद्रपूर

Web Title: Zero sales of investment millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.