शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

जि. प. विषय समित्यांवरही भाजपचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 6:00 AM

जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात दुपारी १ वाजता मूलचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत सभापतीपदांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जि. प. मध्ये भाजपचे बहुमत असले तरी सभापदी निवडणुकीत सर्व सदस्य एकत्रित राहावे, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. मोहुर्ली येथे पर्यटनवारीसाठी गेलेले भाजपचे सर्व ३६ सदस्य निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या एक तासापूर्वी सभागृहात दाखल झाले.

ठळक मुद्देकाँग्रेसचा पराभव : नागराज गेडाम समाजकल्याण तर नितू चौधरी बालकल्याण सभापतिपदी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यानंतर गुरूवारी पार पडलेल्या विषय समितीच्या चारही सभापतिपदांवरही विजय प्राप्त करण्यास यश मिळविले. नागराज गेडाम समाजकल्याण सभापतिपदी तर महिला व बालकल्याण सभापती नितू चौधरी तर सभापती म्हणून सुनील उरकुडे व राजू गायकवाड हे विजयी झाले. भाजपच्या उमेदवारांना ३६ तर काँग्रेसच्या उमेदवारांना २० मते पडली.जिल्हा परिषदेच्या मा. सा. कन्नमवार सभागृहात दुपारी १ वाजता मूलचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महादेव खेडकर यांच्या उपस्थितीत सभापतीपदांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. जि. प. मध्ये भाजपचे बहुमत असले तरी सभापदी निवडणुकीत सर्व सदस्य एकत्रित राहावे, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. मोहुर्ली येथे पर्यटनवारीसाठी गेलेले भाजपचे सर्व ३६ सदस्य निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या एक तासापूर्वी सभागृहात दाखल झाले. समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन दुग्ध, महिला व बालकल्याण आणि बांधकाम व अर्थ समितीच्या सभापतिपदासाठी काँग्रेसकडून ममता डुकरे, नयना गेडाम, प्रमोद चिमूरकर व रिना मालेकर तर भाजपकडून नागराज गेडाम, नितू चौधरी, राजु गायकवाड, सुनील उरकुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पिठासीन अधिकारी खेडकर यांनी उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यानंतर हात उंचावून मतदान करण्याची घोषणा झाली. यामध्ये भाजपच्या उमेदवारांना ३६ तर काँग्रेसच्या उमेदवारांना २० मते पडली. भाजपचे जि. प. सदस्य नागराज गेडाम यांची समाजकल्याण सभापतिपदी तर नितू चौधरी यांची महिला व बालकल्याण सभापतिपदी निवड झाली. याशिवाय सुनील उरकुडे व राजू गायकवाड हे सभापतीपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. निकाल जाहीर झाल्यानंतर अध्यक्ष संध्या गुरनुले, माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे गटनेते देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात समर्थक सदस्य व भाजप कार्यकर्त्यांनी जि.प. समोर जल्लोष केला.दोन सभापतींना खातेवाटपनवनिर्वाचित सभापती सुनील उरकुडे व राजू गायकवाड यांना गुरूवारी खातेवाटप झाले नाही. येत्या काही दिवसात सर्वसाधारण सभा होणार असून त्यामध्ये घोषणा केली जाणार आहे. उरकुडे यांच्याकडे अर्थ व बांधकाम तर राजू गायकवाड यांच्याकडे शिक्षण व आरोग्य आणि जि. प. उपाध्यक्ष रेखा कारेकार यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन खाते सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सुधीर मुनगंटीवारांच्या नेतृत्वात कमळ फुलवलेराज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपने जि. प. विषय समित्यांवर पुन्हा एकदा कमळ फुलविले आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सभापतींचे मोठे योगदान राहणार आहे. आमदार मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामुळे विकासकामांना गती येईल, असा दावा भाजपचे गटनेते देवराव भोंगळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केला.

टॅग्स :zpजिल्हा परिषदBJPभाजपा