यमुनामाय देवकरीन यांचे तिसऱ्याही दिवशी उपोषण सुरूच

By Admin | Updated: May 6, 2016 01:00 IST2016-05-06T01:00:16+5:302016-05-06T01:00:16+5:30

महाकाली देवीची असिम भक्त यमुनामाय देवकरीन मानकरीन चांदागड या नावाने प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील यमुनामाय यांना महाकाली मंदिरातील...

Yumunamaay Devakrishan's fasting on the third day continued | यमुनामाय देवकरीन यांचे तिसऱ्याही दिवशी उपोषण सुरूच

यमुनामाय देवकरीन यांचे तिसऱ्याही दिवशी उपोषण सुरूच

उद्या निर्णय घेणार : उपविभागीय अधिकाऱ्यांची आज बैठक
चंद्रपूर : महाकाली देवीची असिम भक्त यमुनामाय देवकरीन मानकरीन चांदागड या नावाने प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील यमुनामाय यांना महाकाली मंदिरातील ट्रस्टीकडून अपमानजनक वागणूक देण्यात आली. तसेच त्यांची गैरसोय करण्यात आली. एकप्रकारे हुकूमशाही पद्धतीने ट्रस्ट चालविण्यात येत आहे. त्यामुळे ट्रस्टचा अधिकार काढण्यात यावा आणि यमुनामाय देवकरीन यांना त्यांचा मान म्हणून दरवर्षी प्रमाणे त्यांना त्यांचा मान देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसह यमुनामाय यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण आरंभले आहे. गुरूवारी तिसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते. दरम्यान, या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ-ठुबे यांनी शुक्रवारी ६ मे रोजी सकाळी १०.३० वाजता महाकाली देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, सहाय्यक धर्मदाय आयुक्त व यमुनामाय, गोंडराजे समाज सुधारकचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली आहे.
चांदागडची महाराणी राणी हिराई हिने माता महाकाली देवीची स्थापना केली. तेव्हापासून गोरगरीब जनता दुरवरून चैत्र महिन्यात जत्रेला येऊन मातेचे दर्शन घेते. त्यांच्या व्यवस्थेसाठी ज्यांना अधिकार दिले आहे, ते स्वत:ची जास्त आणि जनतेची सेवा कमी करतात, असा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. या मंदिरात येणाऱ्या भाविकांचा या ठिकाणी मानसन्मान केला जात नाही. उलट त्यांना शिविगाळ करून अपमानित करण्यात येते. त्यामुळे येथील ट्रस्टचा संपुर्ण कारभार काढून गोंडराजाचे वंशज असलेले गोंडराजे विरेंद्रशहा आत्राम यांच्या गोंडराजे समाज सुधारक ट्रस्टला सर्व अधिकार देण्यात यावे, यमुनामाय देवकरीन मानकरीन चादागड यांना दरवर्षी देण्यात येणारा पुर्ववत देण्यात यावा, त्यांना महाकाली मंदिरात कायमची जागा उपलब्ध द्यावी, महाकाली मंदीर देवस्थान आर्थिक व्यवहाराची विभागीय चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी हे साखळी उपो,ण सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Yumunamaay Devakrishan's fasting on the third day continued