पुरकेपारचा रस्ता मोकळा करण्यासाठी धावली तरुणाई

By Admin | Updated: July 17, 2017 00:42 IST2017-07-17T00:42:52+5:302017-07-17T00:42:52+5:30

जेमतेम लोकसंख्या असलेल्या व चहुबाजूंनी जंगलव्याप्त पुरकेपार गावाच्या मुख्य रस्त्याने जंगल असून रस्ता

The youth who ran to open the street | पुरकेपारचा रस्ता मोकळा करण्यासाठी धावली तरुणाई

पुरकेपारचा रस्ता मोकळा करण्यासाठी धावली तरुणाई

सामूहिक श्रमदान : बोकाळलेल्या झुडपांमुळे नागरिकात होती भीती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवरगाव: जेमतेम लोकसंख्या असलेल्या व चहुबाजूंनी जंगलव्याप्त पुरकेपार गावाच्या मुख्य रस्त्याने जंगल असून रस्ता दिसण्यासाठी गावातील तरूणांनी पुढाकार घेऊन रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे साफ केली आणि रस्ता मोकळा करून गावकऱ्यांना दिलासा दिला.
सिन्देवाही तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत पुरकेपार हे गाव आहे. गावाची लोकसंख्या जेमतेम म्हणजे १४३ असून संपूर्ण आदीवासी वस्ती आहे. गावाच्या चहुबाजुंनी मोठे जंगल असून नेहमी जंगली प्राण्यांचा वावर असतो. गावामध्ये चवथीपर्यंतचे शिक्षण असून पुढील शिक्षणासाठी बाहेरगावालाच यावे लागते. गावामध्ये येण्यासाठी रत्नापूरवरून एकच मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा मोठे जंगल आहे. या रस्त्यावर वाघ, बिबट, अस्वल व इतर हिंस्त्र प्राण्याचा नेहमी वावर असून गावकऱ्यांना या रस्त्याने ये-जा करताना जिव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. गावं तिथे एसटी ही शासनाची भूमिका असली तरी आजपर्यंत या गावामध्ये एसटी पोहचलेली नाही, ही शोकांतिका आहे.
प्रवासाचे कोणतेही मोठे साधन नाही. त्यामुळे सायकल, पायदळ आणि दुचाकी हेच प्रवासाचे साधन आहेत. गावामध्ये पोट भरण्यासाठी कुठलाही व्यवसाय नसून केवळ शेती आणि जंगलावर आधारित व्यवसायच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. अशाही परिस्थितीत ही आदीवासी मंडळी जीवन जगत आहेत.
मात्र मुख्य रस्त्याच्या दुतफर् ा झाडे वाढल्याने व रस्ता नागमोडी असल्याने रस्त्यावर एखादा जंगली प्राणी उभा असल्यास दिसत नाही. वनविभागानेसुध्दा ही झुडपे न तोडल्याने अलिकडे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ती अधीकच वाढून धनदाट झाली. त्यामुळे पुरकेपार येथीलच तरूणांनी पुढाकार घेतला आणि गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपी जंगल कापून रस्ता मोकळा करण्याचे काम २५-३० तुरूण मंडळीनी केले. त्यामुळे गावकऱ्यांना व या रस्त्याने प्रवास करणाऱ्या मंडळींना दिलासा मिळाला आहे. यासाठी अरविंद कुंभरे, संजय कुंभरे, प्रमोद कुळमेथे, देवानंद मडावी, पुंडलिक कुंभरे, प्रशांत दळांजे, भारत मसराम, गुरूदास मडावी, विजय दळांजे, प्रशांत कुंभरे, सचिव मडावी, किशोर दळांजे, प्रफुल्ल धुर्वे आदी तरूणांनी स्वत: हातामध्ये कुऱ्हाड, घेऊन रस्ता साफ केला. गावाच्या विकासासाठी इतरांवर अवलंबून न राहाता आपल्यालाही काम करता येऊ शकते, हे पुरकेपार येथील तरूणांनी दाखवून दिले.

Web Title: The youth who ran to open the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.