शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तरुणींची छेड काढणाऱ्या मजनूला मिळाली जेलची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 16:33 IST

११२ डायल करून तरुणीने पोलिसांना बोलाविले, मजनूला बेड्या

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : शहरामधील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणींची छेड काढणाऱ्या एका मजनूला एका तरुणीने धाडस दाखवत पोलिसांच्या ११२ या टोलफ्री क्रमांकावर कॉल केला. लगेच ब्रह्मपुरी पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधत काही तासांतच मजनूला पकडून गजाआड केले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ब्रह्मपुरी वखार महामंडळाजवळून एक तरुणी आपल्या राहत्या घरून कॉलेजकडे जात असताना एका मजनूने तिच्या मागून मोटारसायकलने येऊन तिला अश्लील स्पर्श करून तिची छेड काढली. पीडित मुलगी घाबरून ओरडली असता त्याने पळ काढला; परंतु एवढ्यावरच हा मजून थांबला नाही. पुढे जाऊन त्याने परत खेड रोडवर दुसऱ्या तरुणीची छेड काढली; परंतु या तरुणीने लगेच स्वतःला सावरून त्याच्या मोटारसायकलचा नंबर लक्षात ठेवला व पोलिसांना ११२ या टोलफ्री क्रमांकावर कॉल केला.

परिवहन ॲपवरून शोधली आरोपीची दुचाकी

ब्रह्मपुरी पोलिसांनी त्वरित हालचाल करून पीडित मुलीशी संपर्क साधला. परिवहन ॲपवरून या मोटारसायकलचा (क्रमांक एमएच ३४ एटी-७१०१) शोध घेऊन आरोपीचाही शोध घेतला. नरेश सुरेश दिवटे (वय २७, रा. पारडगाव, ता. ब्रह्मपुरी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली. पोलिसी हिसका दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगArrestअटकchandrapur-acचंद्रपूर