शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

चंद्रपुरात युवकाची क्रूरपणे हत्या, धडावेगळे केलेले शीर पायाने ठोकरत दूर फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2022 10:44 IST

दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या अवघ्या एक किमी परिसरात थरार

दुर्गापूर (चंद्रपूर) : येथे जुन्या वैमनस्यातून एका युवकाची सोमवारी रात्री १०:४५ च्या सुमारास भर रस्त्यावर धारदार शस्त्राने शीर धडावेगळे करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. ही थरारक घटना दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या एक किमी परिसरातील सुमित्रनगर तुकूम येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ घडली. या प्रकरणात दुर्गापूर पोलिसांनी दोन तर स्थानिक गुन्हे शाखेने आठ जण अशी एकूण दहा आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी धडापासून वेगळे केलेले शीर पायाने ठोकरत ठोकरत दूर रस्त्याच्या कडेला फेकले, यावरून ही हत्या किती क्रूरपणे करण्यात आली हे लक्षात येते.

महेश मेश्राम (३२, रा. तीर्थरूपनगर, चंद्रपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. महेश सोमवारी सायंकाळी ८:३० दरम्यान आपल्या काही मित्रांसमवेत एसटी वर्कशॉप चौकात येऊन बसला होता. काही वेळाने त्यांच्या ओळखीचे दोन युवक तिथे आले. त्यांनी रात्री १० च्या सुमारास त्याला सुमित्रनगर तुकूम येथील इमली बारमध्ये पिण्याकरिता सोबत नेले. बारमध्ये आधीच आणखी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक बसले होते. 

संशयास्पद परिस्थिती बघून महेश मेश्राम हा बारच्या बाहेर आला व आपल्या मित्राला कारने घरी सोडून देण्यास सांगितले. बारच्या बाहेर असलेल्या युवकांनी कारचे दार उघडताच त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. त्याही परिस्थितीत महेशने तिथून जवळच असलेल्या नायरा पेट्रोल पंपाकडे पळ काढला. त्या वेळेस परत त्याचा मित्र त्याला वाचविण्याकरिता कार घेऊन तिथे आला असता हल्लेखोरांनी कारच्या काचांची तोडफोड केली. अशातच पाच ते सहा युवकांनी धारदार शस्त्राने महेशवर एकामागून एक अनेक वार केले.

नायरा पेट्रोल पंपावरून काही अंतर पुढे गेल्यावर तो जागीच कोसळला. १०:४५ च्या सुमारास हल्लेखोरांनी तिथेच भर रस्त्यावर धारदार शस्त्राने त्याचे शीर धडावेगळे केले. भर रस्त्यावर रक्ताचा सडा पसरलेला होता. हल्लेखोरांनी नंतर त्याचे कापलेले मुंडके पायाने ठोकरत ठोकरत काही अंतरावर नेऊन रस्त्याच्या एका कडेला फेकले. रक्ताच्या स्पष्ट खुणा दिवसाही घटनास्थळी दिसत होत्या. 

हल्लेखोरांच्या हातात तलवार, कुन्हाड, फरशा, लोखंडी पाईपसारखे शस्त्र होते. विशेष म्हणजे दुर्गापूर पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर हा थरार घडला.

याबाबत दुर्गापूर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी लगेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आठ आरोपींना रात्रीच अटक करणयात आली.

आरोपींना सिनेस्टाईल अटक

हत्या केल्यानंतर आरोपी नागपूरच्या दिशेने पळून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना सिनेस्टाईल पाठलाग केला. नागपूर मार्गावर वर्धा जिल्ह्यातील आरंभा नाका येथे वाहनावर संशय येताच पोलिसांनी आपले वाहन आडवे लावले. यानंतर मोठ्या शिताफिने आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरPoliceपोलिसArrestअटक