दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST2021-02-27T04:36:24+5:302021-02-27T04:36:24+5:30

पुरुषोत्तम फकिराचंद धाडसे (३०) असे मृत युवकाचे नाव असून, तो नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती शंकरपूर ...

Youth dies in two-wheeler accident | दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

पुरुषोत्तम फकिराचंद धाडसे (३०) असे मृत युवकाचे नाव असून, तो नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील रहिवासी आहे. हा व्यक्ती शंकरपूर येथील चुलत भावाकडे स्वतःच्या दुचाकीने जेवणाच्या कार्यक्रमाला आला होता. जेवण आटोपून भिवापूर येथे परत जात असताना जवराबोडी रस्त्यावरील गोसेखुर्द नहराजवळ हा अपघात झाला. नेमका हा अपघात दुचाकीवरून पडल्याने झाला की कोणत्या दुसऱ्या वाहनाने येऊन त्याला धडक दिली, याची माहिती मिळू शकली नाही. शंकरपूर येथील तीन युवक भिवापूर येथून परत येत असताना मृत रस्त्याच्या बाजूला पडून दिसला. त्यांनी लगेच याची माहिती पोलीस चौकीला दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शवविच्छेदन भिवापूर येथे करण्यात आले असून, शंकरपूर पोलीस चौकीत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विनोद जांभळे करीत आहेत. मृताचे लग्न झाले असून तीन वर्षांची मुलगी आहे.

Web Title: Youth dies in two-wheeler accident