विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:43+5:302021-01-19T04:29:43+5:30
राजुरा : राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील १८ वर्षीय रोशन केशव मडावी याचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला. ही ...

विहिरीत पडून युवकाचा मृत्यू
राजुरा : राजुरा तालुक्यातील विहीरगाव येथील १८ वर्षीय रोशन केशव मडावी याचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. हा एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रोशन मडावी हा रविवारी रात्री घराजवळील विहिरीच्या काठावर बसून मोबाईल पाहत होता. अचानक त्याचा तोल गेला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने वाचविणे शक्य झाले नाही. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती विरुर पोलिसांना देण्यात आली. सोमवारी सकाळीच विहिरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राजुरा रुग्णालयात पाठविला. पुढील तपास विरुर पोलीस करीत आहे.