जुगार खेळताना युवकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:32 IST2021-09-12T04:32:44+5:302021-09-12T04:32:44+5:30

वरोरा : शहरातील आनंदवन चौकातील हॉटेलमध्ये एका युवकास जुगार खेळताना मारहाण करण्यात आली. युवक जखमी झाला. याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख ...

Youth beaten while gambling | जुगार खेळताना युवकास मारहाण

जुगार खेळताना युवकास मारहाण

वरोरा : शहरातील आनंदवन चौकातील हॉटेलमध्ये एका युवकास जुगार खेळताना मारहाण करण्यात आली. युवक जखमी झाला. याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांवर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

वरोरा शहरातील आनंदवन चौकामध्ये एका हॉटेलमध्ये जुगार खेळणे सुरू होते. भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील रहिवासी प्रवीण सुधाकर पारखी (३०) हासुद्धा जुगारात सहभागी झाला होता. प्रवीण पारखी काही रक्कम जिंकला होता. तुझ्या भ्रमणध्वनीमध्ये सेन्सर लावला. त्यामुळे तू जिंकला यावरून त्याच्याशी भांडण झाले. त्यानंतर हाणामारी झाली. यात प्रवीण पारखी याला गंभीर दुखापत झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते. प्रवीण पारखी याने वरोरा पोलिसात तक्रार देत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते व इतरांनी मला मारहाण केली, असे नमूद केले. या तक्रारीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मते व इतरांवर भादंविच्या कलम ३२४, १४३, १४७, १४९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Web Title: Youth beaten while gambling