युवकांकडून भन्तेजींना मारहाण

By Admin | Updated: September 2, 2015 00:40 IST2015-09-02T00:40:42+5:302015-09-02T00:40:42+5:30

येथील एका बौद्ध विहारात काही युवक सिगारेट पीत होते. यादरम्यान, विहारातील भन्तेंनी या युवकांना सिगरेट पिण्यास मज्जाव केला.

The youth beat up Bhanteji | युवकांकडून भन्तेजींना मारहाण

युवकांकडून भन्तेजींना मारहाण

सहा जणांना अटक : सिगारेट पिण्यास मज्जाव केला
चंद्रपूर : येथील एका बौद्ध विहारात काही युवक सिगारेट पीत होते. यादरम्यान, विहारातील भन्तेंनी या युवकांना सिगरेट पिण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतापलेल्या या युवकांनी आपल्या काही मित्रांना बोलावून भन्तेजींना मारहाण केली. सोमवारी रात्री ९ वाजता घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा युवकांना अटक केली. क्रिष्णा महतो (१९), नितीन तरडे (२५), शुभम शघुंग (१९), विजय ऊर्फ विक्की तांबे, श्याम ऊर्फ आकाश महंतो, सूरज ननेत (२०) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक चोरखिडकी परिसरातील अशोकनगरस्थित बौद्ध विहारात बसून दोन युवक सिगारेट पीत होते. त्यामुळे बौद्ध विहारातील भन्ते आर्यसूत्त यांनी या युवकांना धार्मिकस्थळी सिगारेट पिण्यासाठी मज्जाव केला. त्यांना समज देत तेथून निघून जाण्याबाबत विनंती केली. परंतु यामुळे हे युवक संतप्त झाले. त्यांनी आणखी चौघा मित्रांना तेथे बोलावून घेतले. या मित्रांच्या मदतीने भंत्ते आर्यसूत्त यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी भंतेंना या युवकांच्या तावडीतून सोडविले. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: The youth beat up Bhanteji